Home बातम्या 32MP डुअल सेल्फी, 8GB रॅम आणि 4500mAh बॅटरी सह ग्लोबली लॉन्च झाला Vivo V19, देईल का Xiaomi ला टक्कर

32MP डुअल सेल्फी, 8GB रॅम आणि 4500mAh बॅटरी सह ग्लोबली लॉन्च झाला Vivo V19, देईल का Xiaomi ला टक्कर

चिनी स्मार्टफोन कंपनी Vivo ने चुपचाप ग्लोबली आपल्या वी सीरीज मध्ये नवीन फोन Vivo V19 सादर केला आहे. कोरोना वायरसमुळे Vivo V19 चा भारतातील लाँन्च रद्द करावा लागला होता. पण अजूनतरी कंपनीने भारतात डिवाइसच्या लॉन्चची नवीन तारीख सांगितली नाही. चला जाणून घेऊया या फोन बाबत सर्वकाही.

डिजाइन

फोनच्या लुक आणि डिजाइन बाबत बोलायचे तर वीवो वी19 कंपनीने डुअल पंच-होल डिस्प्ले सह सादर केला आहे. स्क्रीनच्या उजवीकडे डुअल पंच होल आहे. तसेच फोनच्या मागे डावीकडे कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो L शेप मध्ये आहे. क्वाड कॅमेरा आणि फ्लॅश लाईट वर्टिकल शेप मध्ये आहे.

बॅक पॅनल वर खालच्या बाजूला डावीकडे Vivo ची ब्रँडिग आहे. त्याचप्रामणे फोनच्या उजवीकडे पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे. फोटो मध्ये Vivo V19 ब्लॅक कलरचा आहे त्याचबरोबर यूएसबी टाईपी सी चार्जर देण्यात आला आहे. फोन Sleek Silver आणि Gleam Black कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे.

दमदार कॅमेरा

Vivo V19 च्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन मध्ये अपर्चर f/1.79 सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. त्याचबरोबर f/2.2 अपर्चर सह 8 मेगापिक्सलची सेकेंडरी वाइड अँगल लेंस, f/2.4 अपर्चर सह 2 मेगापिक्सलची बोके लेंस आणि f/2.4 अपर्चर सह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. याव्यतिरिक्त फोनची सर्वात खास बाब फोनच्या फ्रंटला असलेला डुअल-पंच होल कॅमेरा आहे. वीवो वी19 मध्ये अपर्चर f/2.08 सह 32 मेगापिक्सलचा मेन सेंसर आणि f/2.28 अपर्चर सह 8 मेगापिक्सलची लेंस आहे. फ्रंटला सुपर नाइट सेल्फी, सुपर वाइड-अँगल सेल्फी, अल्ट्रा स्टेबल सेल्फी वीडियो, आर्ट पोर्ट्रेट वीडियो, सेल्फी सॉफ्टलाइट बॅंड आणि आर्ट पोर्ट्रेट मोड देण्यात आले आहेत.

स्पेसिफिकेशन्स

फोनच्या स्पेसिफिकेशन्स बाबत बोलायचे तर वीवो वी19 मध्ये 6.44-इंचाचा FHD+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 20:9 आणि स्क्रीन रेज्योल्यूशन 2400×1080 पिक्सल आहे. फोन मध्ये 2.3GHz ऑक्ट-कोर स्नॅपड्रॅगॉन 712 SoC देण्यात आला आहे. तसेच फोन 8GB रॅम आणि दोन स्टोरेज वेरिएंट 128GB व 256GB सह आला आहे.

हँडसेट मध्ये ट्रिपल कार्ड स्लॉट असेल, ज्यात दोन सिम सह एक माइक्रोएसडी कार्ड वापरता येईल. पावर बॅकअपसाठी Vivo V19 मध्ये 4,500mAh ची बॅटरी 33W वीवो फ्लॅश चार्ज 2.0 सह देण्यात आली आहे. फोन एंडरॉयड 10-बेस्ड फनटच OS 10 वर चालतो. कनेक्टिविटी ऑप्शनसाठी डिवाइस मध्ये वाई-फाई 802.11 a/b/g/n, ब्लूटूथ 5.0, 4G आणि टाइप-सी पोर्ट आहे.