Home बातम्या Vivo V19 इंडोनेशिया मध्ये झाला लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Vivo V19 इंडोनेशिया मध्ये झाला लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Vivo ने गेल्या महिन्यात घोषणा केली होती कि कंपनी 10 मार्चला इंडोनेशिया मध्ये आपल्या ‘वी सीरीज’ अंतर्गत Vivo V19 स्मार्टफोन लॉन्च करेल. होळीच्या दिवशी म्हणजे काल वीवोने हा डिवाईस इंडोनेशियन मार्केट मध्ये सादर केला आहे. पंच होल डिस्प्ले आणि क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झालेला Vivo V19 गेल्या वर्षी भारतात लॉन्च झालेल्या Vivo V17 चा रिब्रँडेड वर्जन असल्याचे बोलले जात आहे. एक गोष्ट समजून घ्या कि इंडोनेशिया मध्ये लॉन्च झालेला Vivo V19 पुढील काही दिवसांत भारतीय बाजारात पण लॉन्च होईल, परंतु भारतात येणारा वीवो वी19 इंडोनेशियन मॉडेल पेक्षा खूप वेगळा आणि ऍडव्हान्स असेल.

इंडोनेशिया मध्ये लॉन्च झालेल्या Vivo V19 ची माहिती देण्याआधी सांगू इच्छितो की हा फोन याच महिन्यात भारतात पण अनाउंस केला जाऊ शकतो. इंडोनेशिया मध्ये वीवो वी19 सिंगल पंच होल वर लॉन्च झाला आहे तर भारतात वीवो वी19 डुअल पंच होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. तर Vivo V19 चा इंडियन मॉडेल क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट सह येऊ शकतो. आशा आहे कि आईपीएल टूर्नामेंटच्या वेळी वीवो वी19 भारतीय बाजारात येईल.

Vivo V19

इंडोनेशिया मध्ये लॉन्च झालेल्या वीवो वी19 बद्दल बोलल्येचे तर हा डिवाईस 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च झाला आहे जो 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ ई3 सुपर एमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने वी19 ची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह सादर केली आहे. इंडोनेशिया मध्ये हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

Vivo V19 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस सपोर्ट करतो. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी Vivo V19 मध्ये एफ/2.45 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo V19 एंडरॉयड 10 आधारित फनटच ओएस वर लॉन्च झाला आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 एआईई चिपसेट वर चालतो. Vivo V19 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी या डिवाईस मध्ये 18वॉट डुअल इंजन फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह 4500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. इंडोनेशिया मध्ये हा फोन 4,299,000 IDR मध्ये लॉन्च केला गेला आहे आणि हि किंमत इंडियन करंसीनुसार 22,000 रुपयांच्या आसपास आहे. Vivo V19 च्या इंडिया लॉन्चच्या माहितीसाठी वाट बघावी लागेल.