Vivo चे अपकमिंग Vivo V19 आणि Vivo V19 Pro भारतात लॉन्च होणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. 91मोबाईल्सने सांगितले होते कि IPL टी20 टूर्नामेंटच्या आधी हे फोन्स बाजारात सादर केले जातील. तसेच आता आम्हाला माहिती मिळाली आहे कि Vivo V19 सीरीज भारतात या महिन्याच्या शेवटी प्री-बुकिंगसाठी सादर केली जाईल.
रिपोर्ट्सनुसार वीवो वी19 सीरीज 20,000-30,000 रुपयांच्या बेस किंमतीत सादर केला जाऊ शकतो. आशा आहे कि कंपनी Vivo V19 सीरीज ऑनलाइन व ऑथराइज्ड स्टोर वर सेलसाठी सादर केली जाईल.
Vivo कंपनी इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL ची प्रमुख प्रायोजक आहे आणि पुढील IPL मार्चच्या 23 तारखेपासून सुरु होणार आहे. राहिला प्रश्न वीवो वी19 आणि वी19 प्रो च्या किंमत आणि स्पेसिफिकेशनचा तर याबाबत अजूनतरी जास्त माहिती मिळाली नाही. Vivo V19 सीरीजच्या फोन्सचे स्पेसिफिकेशन्स Vivo V17 सीरीज पेक्षा अपग्रेडेड असतील.
Vivo V17 Pro
हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2440 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. Vivo V17 Pro च्या स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. Vivo V17 Pro एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस 9.1 वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालेल.
Vivo V17 Pro च्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. फोनचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे. त्याचबरोबर 13 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा तिसरा सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा चौथा सेंसर आहे. सेल्फी कॅमेरा पाहता यात दोन्ही सेंसर पॉप-अप मेकॅनिज्म वर आहेत. प्राइमरी सेल्फी कॅमेरा 32 मेगापिक्सलचा आहे जो एफ/2.0 अपर्चर सह येतो. तसेच फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
हा एक डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह पावर बॅकअपसाठी Vivo V17 Pro मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4100एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी यूएसबी टाईप सी पोर्टच्या माध्यमातून चार्ज केली जाईल. Vivo V17 Pro 8 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह 27,990 रुपयांमध्ये ग्लेशियर आइस आणि मीडनाईट ओशियन कलर मध्ये विकत घेता येईल.
Vivo V17
Vivo V17 चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 20:9 आस्पेक्ट रेशियो सह लॉन्च झाला आहे जो 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ ई3 सुपर एमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने या फोनच्या पंच-होलला जगातील सर्वात छोटी साईज म्हटले आहे. कंपनीने वी17 च्या स्क्रीन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. इंडियन मार्केट मध्ये हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो.
Vivo V17 एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस 9.2 सह लॉन्च झाला आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 एआईई चिपसेट वर चालतो. Vivo V17 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या डिवाईस मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 4500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Vivo V17 मीडनाईट ओशियन आणि ग्लेशियर आइस कलर मध्ये 22,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे.
