91mobiles ने काही दिवसांपूर्वी एका रिपोर्ट मध्ये Vivo V20 SE हँडसेटची लॉन्च डेट आणि प्री-बुकिंग ऑफर्सची माहिती दिली होती. आज कंपनीने हा डिवाइस अधिकृतपणे सादर केला आहे. हा फोन कंपनीने Vivo V20 सीरीज मध्ये सादर केला आहे. या सीरीज मध्ये Vivo V20 SE व्यतिरिक्त Vivo V20 पण भारतात गेल्याच महिन्यात लॉन्च केला गेला होता. तर येत्या काही दिवसांत Vivo V20 Pro पण भारतीय बाजारात सादर केला जाऊ शकतो.
‘Vivo V20 सीरीज’ मध्ये Vivo V20, Vivo V20 SE आणि Vivo V20 Pro स्मार्टफोन इंटरनेशनल मार्केट मधील वेगवेगळ्या बाजारांमध्ये आधीच आले आहेत. पण भारतात आतापर्यंत फक्त वीवो वी20 आणि वी20 एसई भारतीय बाजारात सादर केले गेले आहेत. पण काही दिवसांत V20 Pro लवकरच भारतात एंट्री करणार आहे. पण याची अधिकृत माहिती समोर आली नाही.
दमदार कॅमेरा
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वी20 एसई ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची बोका लेंस देण्यात आली आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
डिस्प्ले
वीवो वी20 एसई चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर झाला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.12 टक्के आहे. या फोन मध्ये 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.44 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी यात कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्ट केला गेला आहे.
हार्डवेयर
Vivo V20 SE अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो फनटचओएस 11 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 11नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर चालणारा आक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट देण्यात आला आहे. मलेशिया मध्ये वीवो वी20 एसई 8 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.
बॅटरी आणि कनेक्टिविटी ऑप्शन
Vivo V20 SE डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी वी20 एसई मध्ये 33वॉट फ्लॅशचार्ज टेक्नॉलॉजी असलेली 4,100एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनचे डायमेंशन 161 x 7.48 x 7.83एमएम आणि वजन 171 ग्राम आहे.
किंमत
Vivo V20 SE ची किंमत पाहता याचा 8GB + 128GB मॉडेल 20,990 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. हा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये आला आहे, ज्यात ऍक्वामरीन ग्रीन आणि ग्रॅव्हिटी ब्लॅकचा समावेश आहे. हा फोन मंगळवार 3 नोव्हेंबर पासून विक्रीसाठी येईल आणि हा वीवो इंडिया ई-स्टोर सोबत प्रमुख ई-कॉमर्स वेबसाईट्सच्या माध्यमातून खरेदीसाठी उपलब्ध होईल.
