Vivo ने काही दिवसांपूर्वी टेक मार्केट मध्ये आपल्या ‘वी20 सीरीज’ ची सुरवात करत Vivo V20 Pro 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन सर्वात आधी थाईलँड मध्ये आला आहे जो येत्या काही दिवसांत इतर बाजारांमध्ये येईल. आज या सीरीजचा विस्तार करत वीवोने अजून एक नवीन मोबाईल Vivo V20 SE पण टेक मंचावर सादर केला आहे. हा फोन सध्या मलेशिया मध्ये लॉन्च झाला आहे नंतर हा इतर बाजारांमध्ये येईल.
Vivo V20 SE
वीवो वी20 एसई चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर झाला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.12 टक्के आहे. या फोन मध्ये 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.44 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्ट केला गेला आहे.
Vivo V20 SE अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो फनटचओएस 11 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 11नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर चालणारा आक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट देण्यात आला आहे. मलेशिया मध्ये वीवो वी20 एसई 8 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वी20 एसई ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची बोका लेंस देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Vivo V20 SE डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी वी20 एसई मध्ये 33वॉट फ्लॅशचार्ज टेक्नॉलॉजी असलेली 4,100एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनचे डायमेंशन 161 x 7.48 x 7.83एमएम आणि वजन 171 ग्राम आहे.
Vivo V20 SE मलेशिया मध्ये RM 1,199 म्हणजे भारतीय करंसीनुसार जवळपास 22,000 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो Oxygen Blue आणि Gravity Black कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. वीवो वी20 सीरीज भारतीय बाजारात कधी पर्यंत येईल याबाबत माहिती आल्यास वाचकांना दिली जाईल.
