Categories: बातम्या

लाँचपूर्वीच Vivo V27 Pro ची किंमत झाली लीक

Highlights
  • Vivo V27 Pro 1 मार्चला भारतात लाँच होईल.
  • या फोनचे दोन मेमरी व्हेरिएंट्स बाजारात येतील.
  • विवो वी27 प्रोची प्रारंभिक किंमत 41,999 असेल.

Vivo V27 Series 1 मार्चला भारतात लाँच होत आहे आणि ज्यात Vivo V27 तसेच Vivo V27 Pro स्मार्टफोन्सचा समावेश केला जाऊ शकतो. अनेक लीक्समधून या दोन्ही मोबाइल फोन्सच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. हे फोन बाजारात येण्यापूर्वीच आज विवो वी27 प्रोच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. या फोनच्या मेमरी व्हेरिएंट्स आणि त्यांच्या किंमतीची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Vivo V27 Pro ची संभाव्य भारतीय किंमत

समोर आलेल्या रिपोर्टनुसार विवो वी27 प्रो स्मार्टफोन भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच होऊ शकतो. याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज असल्याचं सांगण्यात आलं आहे, ज्याची किंमत 41,999 रुपये असू शकते. तसेच लीकनुसार मोठा मॉडेल 12 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करेल जो 45,999 रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो. हा मोबाइल फोन Magic Blue आणि Noble Black कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: पुन्हा ताज्या झाल्या जुन्या आठवणी! रिमूव्हेबल बॅटरीसह स्वस्त आणि शानदार Nokia C02 लाँच

Vivo V27 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.78″ AMOLED 120Hz display
  • MediaTek Dimensity 8200
  • 12GB RAM + 256GB Storage
  • 50MP Selfie Camera
  • 50MP Rear Camera
  • 66W 4,600mAh battery

विवो वी27 प्रो चीनमध्ये लाँच झालेल्या विवो एस16 प्रोचा रीब्रँडेड व्हर्जन असेल. त्यामुळे या दोन्ही मोबाइल फोन्सचे स्पेसिफिकेशन्स एकसारखे असतील, Vivo S16 Pro बद्दल बोलायचं झालं तर यात 6.78 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे जो इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी येतो. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते.

Vivo V27 Pro मध्ये देखील 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 8200 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो जो 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर काम करेल. तसेच एस16 प्रो मध्ये मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजी आहे जी 8जीबी व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो. वी27 प्रो मध्ये 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,600एमएएचची बॅटरी मिळते. हे देखील वाचा: दगडासारखा दणकट फोन! Doogee S100 मध्ये 10800mAh बॅटरी आणि 12GB रॅम

फोटोग्राफीसाठीसाठी या फोनच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये एफ/1.88 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल Sony IMX766V प्रायमरी सेन्सर, एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

Published by
Siddhesh Jadhav