दगडासारखा दणकट फोन! Doogee S100 मध्ये 10800mAh बॅटरी आणि 12GB रॅम

Highlights

  • स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच झाला आहे.
  • 12GB RAM सह Helio G99 प्रोसेसर मिळतो.
  • फोनमध्ये 6.58 इंचाचा FHD+ IPS डिस्प्ले आहे.

स्मार्टफोन घेणं जितकं सोपं आहे तितकंच कठीण काम सांभाळून ठेवणं आहे. परंतु चिनी कंपनी Doogee मात्र असे स्मार्टफोन सादर करते ज्यांची काळजी घ्यावी लागत नाही. असाच एका नवीन मजबूत स्मार्टफोन Doogee S100 कंपनीनं सादर केला आहे. हा एक रगेड स्मार्टफोन आहे ज्यात कंपनीनं MediaTek Helio G99 चिपसेट, 120Hz रिफ्रेश रेट, 12GB RAM, 10800mAh ची बॅटरी आणि 108MP चा कॅमेरा मिळतो. यातील MIL-STD-810H सर्टिफिकेशनमुळे हा फक्त धूळ आणि पाण्यापासून वाचत नाही तर उंचावरून पडून देखील याला काही होत नाही.

Doogee S100 ची किंमत

हा फोन भारतात लाँच झाला नाही परंतु AliExpress वरून हा भारतात आयात करतात येईल. तसेच हा फोन 20 ते 26 मार्च दरम्यान DoogeeMall या कंपनीच्या अधिकृत पोर्टलवरून डिस्काउंटसह विकत घेता येईल. AliExpress वर Doogee S100 ची किंमत 85,510 रुपये ठेवण्यात आली आहे. हे देखील वाचा: 120 km रेंजसह हाय-स्पीड River Indie इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, इतकी आहे किंमत

Doogee S100 चे स्पेसिफिकेशन्स

Doogee S100 फोनमध्ये 6.58 इंचाचा FHD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं यात Helio G99 प्रोसेसरचा वापर केला आहे. जोडीला 12 GB RAM मिळतो, ज्याबाबत कंपनीनं दावा केला आहे की हा कोणत्याची रगेड स्मार्टफोनमधील सर्वाधिक रॅम आहे. फोनमधील 256 जीबीची 2.2 यूएफएस स्टोरेज, मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं 2TB पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी पाहता यात ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो ज्यात मेन कॅमेरा 108MP चा आहे. त्याचबरोबर 20MP चा नाइट व्हिजन सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये 16MP ची अल्ट्रावाइड लेन्स देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी याच्या फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. हे देखील वाचा: पुन्हा ताज्या झाल्या जुन्या आठवणी! रिमूव्हेबल बॅटरीसह स्वस्त आणि शानदार Nokia C02 लाँच

यातील सर्वात मोठी खासियत म्हणजे कंपनीनं हा MIL-STD-810H सर्टिफिकेशनसह सादर केला आहे. त्यामुळे अतिशय खराब परिस्थितीमध्ये देखील हा फोन टिकू शकतो आणि चालू शकतो. तसेच फोनमध्ये IP68 आणि IP69K रेटिंग देखील देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी यात 10,800 mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 66 W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. कंपनीनुसार ही बॅटरी 55 तास कॉल टाइम, 17.5 तास स्ट्रीमिंग आणि 43 तास म्यूजिक प्लेबॅक टाइम देऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here