रिमूव्हेबल बॅटरीसह Nokia C02 लाँच; चालतो अँड्रॉइड 12 गो एडिशनवर

Highlights

  • Nokia C02 स्मार्टफोनमध्ये एक रिमूव्हेबल बॅटरी देण्यात आली आहे.
  • हा फोन IP52 रेटिंगला सपोर्ट करतो.
  • अँड्रॉइड गो एडिशनमुळे गुगलच्या लाइट अ‍ॅप्सचा वापर यात करता येतो.

जेव्हा स्मार्टफोन नवीनच बाजारात आले होते तेव्हा त्यात रिमूव्हेबल म्हणजे सहज काढता येईल अशी बॅटरी दिली जायची. त्यामुळे एक दोन वर्षांनी बॅटरी बॅकअप कमी झाला तर ग्राहकांना सहज नवीन बॅटरी टाकता यायची. पण हल्ली तसे घडत नाही, बजेट स्मार्टफोनमध्ये देखील रिमूव्हेबल बॅटरी मिळत नाही. अजूनही काही हँडसेट आहेत जे ही सुविधा देतात आणि त्यात आता नवीन Nokia C02 चा समावेश करू शकता, ज्यात रिमूव्हेबल बॅटरी देण्यात आली आहे.

Nokia नं कोणताही गाजावाजा न करता एक किफायतशीर स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच केला आहे. Nokia C02 नावाचा कंपनीचा नवा स्मार्टफोन एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे. यात 5.45-इंचाचा एलसीडी डिस्प्ले, IP52 वॉटर प्रूफिंग, 3000mAh ची बॅटरी, 2GB रॅम आणि अँड्रॉइड 12 गो एडिशन असे फीचर्स मिळतात. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती. हे देखील वाचा: Realme Mobile मध्ये मिळणार iPhone 14 Pro सारखा डिस्प्ले! माधव सेठ यांनी चुकून केलं ट्वीट

Nokia C02 चे स्पेसिफिकेशन्स

  • 5.45 inch LCD Display
  • IP52 Rating
  • 2GB RAM, 32GB Storage
  • Android 12 Go Edition
  • 3000mAh Removable Battery

Nokia C02 मध्ये कंपनीनं 5.45-इंचाचा डिस्प्ले दिला आहे. हा एक LCD पॅनल आहे जो FWVGA+ रिजोल्यूशन आणि 18:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह येतो. डिजाईन देखील जुनाट आहे कारण कंपनीनं डिस्प्लेच्या बाजूला जाड बेजल दिले आहेत. याची फ्रेम पॉलिकार्बोनेटपासून बनवण्यात आली आहे, तर बॅक पॅनलवर नॅनो टेक्श्चर आहे. हा फोन IP52 रेटेड आहे, त्यामुळे पाणी आणि धुळीपासून याचे काही प्रमाणात संरक्षण होऊ शकते.

प्रोसेसिंगसाठी कंपनीनं Nokia C02 मध्ये निनावी क्वॉड-कोर चिपसेटचा वापर केला आहे, ज्याचा क्लॉक स्पीड 1.4GHz आहे. जोडीला 2GB RAM आणि 32GB eMMC 5.1 स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं वाढवता देखील येते. हा फोन अँड्रॉइड 12 गो एडिशनवर चालतो, जो कमी रॅम आणि मेमरीसह देखील स्मूद चालू शकतो. विशेष म्हणजे कंपनी दोन वर्षांचे सिक्योरिटी अपडेट देणार आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 5MP चा सिंगल रियर कॅमेरा दिला आहे, जोडीला एलईडी फ्लॅश देखील मिळतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीनं 2 MP च्या फ्रंट फेसिंग कॅमेऱ्याचा वापर केला आहे. पावर बॅकअपसाठी कंपनीनं 3,000mAh ची बॅटरी दिली आहे, जी एक दिवसाचा बॅकअप देऊ शकते असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच रिमूव्हेबल असल्यामुळे तुम्ही ती स्वतः बदलू देखील शकता. हे देखील वाचा: OnePlus Nord 3 ची वाट पाहत असाल तर नक्की वाचा; स्पेसिफिकेशन्स आणि लाँचची माहिती लीक

हा एक ड्युअल सिम स्मार्टफोन आहे, ज्यात बेसिक कनेक्टव्हिटी फीचर्स मिळतात. ज्यात 4G, 3.5mm ऑडिओ जॅक आणि मायक्रो यूएसबी कनेक्टरचा समावेश आहे. या स्मार्टफोनची किंमत मात्र कंपनीनं सांगितली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार हा फोन 6,600 रुपयांच्या आसपास उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here