Vivo v29 Series भारतात लाँच झाली आहे. ह्या सीरिजमध्ये Vivo V29 आणि Vivo V29 Pro सारखे दोन नवीन मोबाइल सादर झाले आहेत. ह्या सीरिजचा विवो वी29 स्मार्टफोन 12GB पर्यंत रॅम, शानदार कॅमेरा एक्सपीरियंससाठी ऑरा लाइट फीचर, 6.78 इंचाचा मोठा अॅमोलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह अनेक वैशिष्ट्ये आहेत. आम्ही ह्या पोस्टमध्ये तुम्हाला ह्याचे स्पेसिफिकेशन आणि किंमत सांगणार आहोत.
Vivo V29 ची किंमत आणि उपलब्धता
- कंपनीनं Vivo V29 स्मार्टफोन दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात आणला आहे. ज्यात 8GB रॅम +128GB स्टोरेज आणि 12GB रॅम+ 256 जीबी स्टोरेजचा समावेश आहे.
- ह्यात बेस मॉडेलची किंमत 32,999 रुपये आहे आणि टॉप व्हेरिएंट 36,999 रुपयांचा आहे.
- कलर ऑप्शन पाहता युजर्सना ह्या फोनसाठी स्पेस ब्लॅक, मजिस्टिक रेड आणि हिमालयन ब्लू सारखे तीन कलर ऑप्शन मिळतील.
- हा डिवाइस ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट, कंपनी वेबसाइट आणि इतर रिटेल आउटलेटवर 17 ऑक्टोबरपासून सेलसाठी उपलब्ध होईल.
- तसेच फोन्सची प्री-बुकिंग आजपासून सुरु करण्यात आली आहे.
Vivo V29 चा कॅमेरा
- Vivo v29 डिवाइसची खासियत म्हणजे ह्यात चांगला कॅमेरा आहे. युजर्सना ह्यात 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जात आहे ज्याच्या मदतीनं फोटोग्राफी एक्सपीरियंस शानदार मिळतो.
- त्याचबरोबर बॅक पॅनलवर ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन टेक्नॉलॉजीसह 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स, 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची बोकेह लेन्स देण्यात आली आहे.
- बॅक कॅमेराची खासियत म्हणजे ह्यात ऑरा लाइट फीचर आहे. ज्याची मदतीनं नाइट फोटोग्राफी खूप चांगली होते. इतकेच नव्हे तर कंपनीचा दावा आहे की डिवाइस वेडिंग फोटोग्राफीसाठी जबरदस्त आहे.
Vivo V29 चे स्पेसिफिकेशन्स
- डिस्प्ले: Vivo V29 5G डिवाइसमध्ये युजर्सना 6.78 इंचाचा फुल एचडी प्लस 3D कर्व अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2800 x 1260 पिक्सल रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
- प्रोसेसर: फोनचा प्रोसेसर पाहता कंपनीनं ह्यात दमदार परफॉर्मन्ससाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेटचा वापर केला आहे.
- स्टोरेज: डेटा स्टोर करण्यासाठी कंपनीनं स्मार्टफोन दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात आणला आहे. ज्यात 8GB रॅम +128GB स्टोरेज आणि 12GB रॅम+ 256 जीबी स्टोरेजचा समावेश करण्यात आला आहे.
- बॅटरी: चांगल्या परफॉर्मन्ससह कंपनीनं बॅटरी आणखी दमदार ठेवली आहे. युजर्सना डिवाइसमध्ये 4600 एमएएचची बॅटरी, 80वॉट फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.
- वजन आणि डायमेंशन: डिवाइसचे वजन आणि डायमेंशन पाहता 16.418 cm × 7.437 cm × 0.746 cm आणि 186 ग्राम आहे.
- ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 आधारित फन टच ओएस 13 वर लाँच झाला आहे.
- अन्य: अन्य फीचर्स पाहता Vivo V29 मध्ये ब्लूटूथ, वाय-फाय, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम 5जी सारखे अनेक फीचर्स मिळतात.
