Home बातम्या 50MP Selfie कॅमेरा असणाऱ्या या फोनची सेल भारतात सुरू, जाणून घ्या मोबाईलवर ऑफर कोणती मिळणार

50MP Selfie कॅमेरा असणाऱ्या या फोनची सेल भारतात सुरू, जाणून घ्या मोबाईलवर ऑफर कोणती मिळणार

Vivo V30 Pro ची सेल भारतात सुरू झाली आहे. 50MP Selfie Sensor, 50MP + 50MP + 50MP Rear Camera आणि 12GB RAM च्या ताकदीसह हा स्मार्टफोन 17 मार्चला विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. खूपच स्टायलिश लूक तसेच जबरदस्त फिचर्ससह या मोबाईलची किंमतीवर मिळणार ऑफर, डिस्काऊंट व डिल्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Vivo V30 Pro चा फोटो

Vivo V30 Pro ची किंमत

विवो वी30 प्रो भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेज मिळते ज्याची किंमत 41,999 रुपये आहे. तसेच फोनचा मोठा व्हेरिएंट 12जीबी रॅमसह 512जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 46,999 रुपये आहे. हा विवो मोबाईल Andaman Blue आणि Classic Black कलरमध्ये विकत घेता येईल.

Vivo V30 Pro वर ऑफर

विवो वी30 प्रो ची सेल कंपनी वेबसाईट तसेच फ्लिपकार्टसह ऑफलाईन रिटेल स्टोर्सवर सुरु झाली आहे. विवो डॉट इनबद्दल बोलायचे झाले तर HDFC आणि ICICI Bank युजर्सना फोन खरेदी केल्यावर 10 टक्के सूट दिली जात आहे. 8GB मॉडेल वर 4199 रुपये तसेच 12GB मॉडेलवर 4699 रुपयांचा इंस्टंट डिस्काऊंट मिळत आहे ज्यानंतर याची किंमत क्रमश: 37,800 रुपये तसेच 42,300 रुपये होईल. याला 6 व 9 महिन्याच्या No Cost EMI वर पण विकत घेता येईल. तसेच फ्लिपकार्टवर शॉपिंग दरम्यान HDFC व SBI कार्ड युजर्सना 4200 रुपयांची सूट दिली जात आहे.

Vivo V30 Pro चे स्पेसिफिकेशन

स्क्रीन : विवो वी30 प्रो स्मार्टफोनमध्ये 2800 × 1260 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाचा पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते तसेच 2800 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते.

परफॉर्मन्स : हा विवो अँड्रॉइड 14 आधारित फनटच ओएस 14 वर लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डाइमेंसिटी 8200 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.1 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो.

मेमरी : Vivo V30 Pro 5G मध्ये 12 जीबी रॅम देण्यात आली आहे. हा मोबाईल 12जीबी एक्सटेंडेड रॅमला पण सपोर्ट करतो जो फिजिकल रॅमसह मिळून याला 24 जीबी रॅमची ताकद देतो. हा फोन 512 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि रिल्ससाठी विवो वी30 प्रो मध्ये 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा ऑटो फोकस ग्रुप फोटो फिचरसह आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा 5पी लेन्स आहे जी 920 फिल्ड ऑफ व्यू तसेच एफ/2.0 अपर्चरला सपोर्ट करते.

बॅक कॅमेरा : फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. यात एफ/1.88 अपर्चर असलेली 50 मेगापिक्सल मेन लेन्स देण्यात आली आहे जी ओआयएस फिचरसह आहे. त्याचबरोबर एफ/2.0 अपर्चर असलेली 50 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच एफ/1.80 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल पोर्टरेट सेन्सर आहे.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी विवो वी30 प्रो 5जी फोनमध्ये 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी मोबाईलमध्ये 80 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी पण देण्यात आली आहे.