Home बातम्या Vivo V40 झाला जागतिक स्तरावर लाँच, यात आहे 12GB रॅम, 5500mAh बॅटरी, 50MP कॅमेरा

Vivo V40 झाला जागतिक स्तरावर लाँच, यात आहे 12GB रॅम, 5500mAh बॅटरी, 50MP कॅमेरा

विवोने जागतिक बाजारात आपल्या वी 40 सीरीजचा नवीन मोबाईल सादर केला आहे. हे सामान्य मॉडेल Vivo 40 5G आहे. तसेच याला खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक कमी वाटू शकते कारण कंपनीने सॅमसंग आणि अ‍ॅप्पल सारख्या ब्रँडला फॉलो करत बॉक्समध्ये चार्जर दिला नाही. तसेच, प्रमुख फिचर्स पाहता हा 12 जीबी पर्यंत रॅम, 512 जीबी पर्यंत स्टोरेज, 5500mAh बॅटरी, स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 चिपसेट आणि 50MP ZEISS लेन्ससह आहे. चला, पुढे किंमत आणि तपशीलवार वैशिष्ट्ये जाणून घ्या.

Vivo V40 5G चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले: Vivo V40 5G फोनमध्ये 6.78-इंचाचा 1.5K अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर 120Hz चा रिफ्रेश रेट, 4500 निट्स पीक ब्राईटनेस आणि 2800 × 1260 चे स्क्रीन रिजॉल्यूशन प्रदान करण्यात आले आहे. तसेच, याची डिझाईन चीनमध्ये सादर केली गेलेल्या Vivo S19 सीरीजशी मिळती जुळती आहे.

प्रोसेसर: मोबाईलमध्ये दमदार परफॉर्मन्ससाठी कंपनीने स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 चिपसेट आणि Adreno 720 जीपीयू सेटअप केला आहे. ज्यामुळे युजर्सना चांगली अनुभव मिळेल.

स्टोरेज: डेटा स्टोर करण्यासाठी डिव्हाईसमध्ये 12 जीबी पर्यंत LPDDR4X रॅम आणि 512जीबी पर्यंत UFS 2.2 इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.

कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता Vivo V40 स्मार्टफोन ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह लाँच करण्यात आला आहे. ज्यात OIS सह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 50 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड Zeiss लेन्स, ऑरा लाईटसह मिळतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

बॅटरी: स्मार्टफोनमध्ये युजर्सना 5,500 mAh ची मोठी बॅटरी मिळते, ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी 80 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. तर कंपनीने बॉक्समध्ये चार्जर दिला नाही.

इतर: इतर फिचर्स पाहता स्मार्टफोनमध्ये पाणी आणि धूळीपासून वाचणारी IP68 रेटिंग, वायफाय 5, ब्लूटूथ 5.4, एनएफसी सारखे अनेक पर्याय मिळतात.

ओएस: ऑपरेटिंग सिस्टमच्या बाबतीत Vivo V40 लेटेस्ट अँड्रॉईड 14 आधारित फनटच ओएस 14 वर चालतो.

Vivo V40 5G ची किंमत

Vivo V40 5G फोन दोन मेमरी पर्यांयासह सादर झाला आहे ज्यात 8GB रॅम +256GB आणि 12GB रॅम +512GB स्टोरेजचा समावेश आहे. फोनच्या बेस मॉडेलमध्ये केस नाही तर टॉप मॉडेलमध्ये दिला जाईल. फोनची प्रारंभिक किंमत €599 म्हणजे जवळपास 53 हजार रुपये सांगितली आहे. डिव्हाईससाठी स्टेला सिल्व्हर आणि नेबुला पर्पल सारखे दोन कलर मिळतील.तसेच, हा सेलसाठी जुलैमध्ये उपलब्ध होईल.