Home बातम्या 8GB रॅम, 50MP कॅमेरा, 3D कर्व्ह स्क्रीन असलेला दर्जेदार फोन Vivo V40e भारतात लाँच, जाणून घ्या किंमतीचा तपशील

8GB रॅम, 50MP कॅमेरा, 3D कर्व्ह स्क्रीन असलेला दर्जेदार फोन Vivo V40e भारतात लाँच, जाणून घ्या किंमतीचा तपशील

भारतीय बाजारात Vivo V40e स्मार्टफोन लाँच झाला आहे. V40 सीरीजमध्ये येणारा हा एक दर्जेदार लुकने सुसज्ज असणारा फोन आहे. यामध्ये ग्राहकांना 3D कर्व्ह पॅनेल आणि 0.749 सेमी पातळ जाडी पाहायला मिळेल. यासह एक्सटेन्डेड तंत्रज्ञानाच्या मदतीने 16 जीबी पर्यंतच्या रॅमची शक्ती, डायमेंसिटी 7300 चिपसेट, 5500एमएएच ची मोठी बॅटरी, 50 मेगापिक्सेल कॅमेरा सारखे अनेक उत्कृष्ट फिचर्स दिले गेले आहेत. चला, पुढे सर्व वैशिष्ट्ये आणि किंमतीची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया.

Vivo V40e ची किंमत उपलब्धता

Vivo V40e स्मार्टफोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये भारतात आला आहे. त्याच्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजची किंमत 28,999 रुपये आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजची किंमत 30,999 रुपये आहे. ऑनलाईन शॉपिंग साईट फ्लिपकार्ट, ब्रँडची वेबसाईट आणि इतर रिटेल आऊटलेट्सवर त्याची पुढील महिन्यात 2 ऑक्टोबरपासून विक्री सुरू होईल. तर त्याचे प्री-बुकिंग आतापासून करता येऊ शकते. लाँच ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास कंपनी बँक ऑफर अंतर्गत एचडीएफसी आणि एसबीआय कार्डांवर 10 टक्के सूट किंवा 10 टक्के एक्सचेंज बोनस देईल.एवढेच नाही तर 6 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही उपलब्ध असेल.

Vivo V40e चे डिझाईन

Vivo V40e 5G च्या मागील पॅनलवर अंडाकृती आकाराचे कॅमेरा मॉड्यूल आणि एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. यासोबत ऑरा लाईट एलईडीही बसवण्यात आला आहे. तर समोर 3D कर्व्ह डिझाईन पहायला मिळत आहे. डिव्हाईसची जाडी फक्त 0.749 सेमी आणि त्याचे वजन 183 ग्रॅम आहे. जर रंग पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास Vivo V40e रॉयल ब्राँझ आणि मिंट ग्रीन सारख्या दोन पर्यायांमध्ये येतो. एकूणच, हा प्रीमियम अनुभव देतो. त्याची झलक तुम्ही फोटो मध्ये पाहू शकता.

Vivo V40e चे स्पेसिफिकेशन

Vivo V40e स्मार्टफोनमध्ये 6.77 इंचाचा मोठा 3D कर्व्ह ॲमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्क्रीनवर 120Hz रिफ्रेश रेट, 1.07 बिलियन ट्रू कलर, 2392 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशन, 93.3 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशो, 8,000,000:1 कॉन्ट्रास्ट रेशो, P3 कलर गॅमट, एचडीआर 10 प्लस सपोर्ट मिळत आहे. यासह, ब्रँडने एसजीएस लो लाईट सर्टिफिकेशन देखील दिले आहे. ज्यामुळे ग्राहकांच्या डोळ्यांवर निळ्या प्रकाशाचा वाईट परिणाम होणार नाही.

चिपसेट

या छान दिसणाऱ्या Vivo स्मार्टफोनमध्ये कंपनीने मीडियाटेक डायमेंसिटी 7300 चिपसेट लावला आहे. हा चार नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनवलेला प्रोसेसर आहे. ज्यासोबत वापरकर्त्यांना 2.5गिगाहर्ट्झ पर्यंतची क्लॉक स्पीड मिळते म्हणजेच ग्राहकांना गेमिंगसह इतर ऑपरेशन्स अगदी सहज करता येतील

स्टोरेज आणि रॅम

Vivo ने V40e स्मार्टफोनला दोन स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच केले आहे ज्यामध्ये 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज समाविष्ट आहे. यासोबतच 8 जीबी एक्सटेन्डेड रॅमचा सपोर्ट देखील मिळत आहे. ज्याच्या मदतीने एकूण 16 जीबी पर्यंतच्या शक्तीचा वापर केला जाऊ शकतो.

डिव्हाईसच्या मागील पॅनेलवर एलईडी आणि ऑरा लाईटसह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. ग्राहकांना रिअर सेटअपमध्ये ओआएस+ ईआयएस सह 50 मेगापिक्सेलचा सोनी प्रोफेशनल नाईट पोर्ट्रेट कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा दिला जात आहे. यात एआय पोर्ट्रेट सूट, एआय इरेजर आणि एआय फोटो एन्हान्सर सह अल्ट्रा-स्टेबल 4K व्हिडिओ काढण्याची सुविधा आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50 मेगापिक्सेलचा आय एएफ ग्रुप सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे ऑरा लाईटच्या मदतीने रात्रीच्या वेळी फोटोग्राफी करणे हा एक उत्तम अनुभव असेल.

बॅटरी आणि चार्जिंग

कंपनीचा दावा आहे की Vivo V40e या सेगमेंटमधील भारतातील सर्वात पातळ स्मार्टफोन आहे ज्यामध्ये 5500 एमएएच ची बॅटरी लावण्यात आली आहे. या मजबूत बॅटरीला चार्ज करण्यासाठी 80 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळत आहे. ज्याच्या मदतीने जवळपास 98 तासांचा म्युझिक प्लेबॅक टाईम वापरता येतो.

इतर

इतर फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर Vivo V40e स्मार्टफोन वॉटर आणि डस्ट प्रोटेक्शन IP64 रेटिंग, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम, 5G, 4G, वाय-फाय, ब्लूटूथ 5.4 यासारख्या अनेक फिचर्सने सुसज्ज आहे.

ओएस

ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर V40e स्मार्टफोन अँड्राईड 14 आधारित फनटच ओएस 14 वर बेस्ड आहे.