मोबाईल निर्माता Vivo या वर्षाच्या शेवटी आपली Vivo X200 सीरीज लाँच करू शकतो, या अंतर्गत Vivo X200 आणि Vivo X200 Pro असे दोन मोबाईल आणले जाण्याची अपेक्षा आहे. तरी हे स्मार्टफोन येण्यासाठी अजून काही महिने आहेत. याआधी त्याच्या प्रो मॉडेलचे स्पेसिफिकेशन आणि डिझाईन बाबतचे लीक समोर आले आहेत. ज्याची माहिती तुम्ही पुढे पोस्टमध्ये वाचू शकता.
Vivo X200 Pro माहिती (लीक)
- आगामी फ्लॅगशिप मोबाईल Vivo X200 Pro बद्दलची माहिती टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने मायक्रो ब्लॉगिंग साईट वीबो वर शेअर केली आहे.
- लीकनुसार Vivo X100 Pro च्या तुलनेत Vivo X200 Pro ला मोठे अपग्रेड आणि नवीन तंत्रज्ञान मिळू शकते.
Vivo X200 Pro मध्ये नवीन तंत्रज्ञान असलेली कर्व्ह स्क्रीन दिली जाऊ शकते, ज्यामध्ये 1.5K रिझोल्यूशन आणि चारही कोपऱ्यांवर ? नैरो बेजेल्स मिळू शकतात. - डिस्प्लेच्या आकाराबद्दल माहिती मिळाली आहे की, हा नवीन मोबाईल 6.7 किंवा 6.8 इंचाचा असू शकतो.
- Vivo ही आपली सीरीज MediaTek Dimensity 9400 चिपसेटसह आणू शकते. हा प्रोसेसर ऑक्टोबरमध्ये सादर केला जाऊ शकतो आणि त्याची स्पर्धा आगामी Snapdragon 8 Gen 4 शी होईल, अशी अपेक्षा आहे.
- Vivo X200 Pro मध्ये सिंगल पॉईंट अल्ट्रासोनिक अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळू शकतो. या डिव्हाईससाठी नवीन सिलिकॉन बॅटरी या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाऊ शकतो. फोनमध्ये अपडेटेड ट्रिपल कॅमेरा दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये चांगल्या अनुभवासाठी पेरिस्कोप लेन्स बसवले जाऊ शकतात. मोबाईलच्या बॅक पॅनलवर शक्यतो तीन 50 मेगापिक्सेल लेन्स असण्याची शक्यता आहे.
Vivo X100 Pro चे स्पेसिफिकेशन्स
- डिस्प्ले: Vivo X100 Pro मध्ये 6.78 इंचाचा LTPO ॲमोलेड डिस्प्ले आहे. यात 1.5K पिक्सेल रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 3000 nits पर्यंत पीक ब्राईटनेस मिळते.
- प्रोसेसर: या फोनमध्ये MediaTek Dimensity 9300 चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी इम्मॉर्टलिस-G720 जीपीयू उपस्थित आहे.
- स्टोरेज: हा डिव्हाईस 16GB पर्यंत रॅम + 512GB पर्यंत UFS 4.0 इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे.
- कॅमेरा: Vivo X100 Pro मध्ये OIS आणि LED फ्लॅशसह 50MP चा 1 इंचाचा Sony IMX989 VCS बायोनिक सेन्सर, 50MP अल्ट्रा-वाईड आणि 50MP 1/2″ APO टेलिफोटो कॅमेरा, OIS, 100x पर्यंत डिजिटल झूम मॅक्रो मोडसह देण्यात आले आहे. त्याचवेळी सेल्फीसाठी 32MP कॅमेरा आहे.
- बॅटरी: Vivo X100 Pro मध्ये 5400mAh ची मोठी बॅटरी दिली गेली आहे. ती चार्ज करण्यासाठी 100W फास्ट चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग आणि रिव्हर्स वायरलेस चार्जिंग सुविधा उपलब्ध आहे.
