देशात सणासुदीचे दिवस सुरू आहेत. हे दिवस लोकांसाठी अजून खास बनवण्यासाठी मोबाईल कंपन्या पण काही ना काही ऑफर्स घेऊन येत असतात. या फेस्टिवल सीजन च्या सुरवातीला दोन मोठे ब्रँड सॅमसंग आणि वीवो ने आपल्या खास स्मार्टफोन्स च्या किंमती कमी करून आपल्या फॅन्सना भेट दिली आहे. या प्राइस कट च्या लिस्ट मध्ये कंपनी ने हाईएंड डिवाईस पासून स्वस्त लो बजेट वाल्या स्मार्टफोन चा समावेश केला आहे. जर तुम्ही पण वीवो किंवा सॅमसंग चा नवीन फोन घेण्याचा प्लान करत असाल तर कंपनी ने स्वस्त केलेल्या स्मार्टफोन्सची खालील यादी तुमच्या कमी येईल.
वीवो
वीवो ने आपल्या हाईएंड डिवाईस एक्स21 ची किंमत 4,000 रुपयांनी कमी केली आहे. कंपनी ने मे महिन्यात हा स्मार्टफोन भारतात 35,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. विशेष म्हणजे वीवो एक्स21 जगातील पहिला फोन आहे ज्यात स्क्रीन खाली फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. फोन मध्ये 6.28-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 6जीबी रॅम आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. किंमत कमी झाल्यानंतर हा फोन 31,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
तसेच वीवो इंडिया ने देशात लॉन्च केलेल्या पहिल्या नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन वीवो वी9 ची किंमत 2,000 रुपयांनी कमी केली आहे. या प्राइस कट नंतर आता पर्यंत 20,990 रुपयांमध्ये मिळणार शानदार फोन 18,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचबरोबर कंपनी च्या सर्वात स्वस्त नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन्स पैकी एक वीवो वाय83 ची किंमत पण 1,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. 14,990 रुपयांमध्ये लॉन्च झालेला हा फोन आता 13,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
सॅमसंग
आपल्या फॅन्सना भेट देत सॅमसंग इंडिया ने कंपनी द्वारा लो बजेट मध्ये लॉन्च केलेल्या गॅलेक्सी जे4 ची किंमत कमी केली आहे. सॅमसंग चा हा 4जी फोन 2जीबी रॅम आणि 3,000एमएएच ची बॅटरी सह बाजारात आला होता. कंपनी ने या फोनची किंमत 9,999 रुपये ठेवली होती पण आता सॅमसंग ने या फोन ची किंमत पण 1,000 रुपयानी कमी केली आहे. म्हणजे 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला गॅलेक्सी जे4 आता फक्त 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
