Vivo ने जेव्हा घोषणा केली होती कि कंपनी टेक बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘एक्स सीरीज’ आणणार आहे तेव्हापासून या सीरीजची वाट बघितली जात होती. वीवोने टीजर द्वारे हे स्पष्ट केले होते कि Vivo X30 series फोटोग्राफी साठी खास असेल. तसेच आता आपली सीरीज सादर करत Vivo ने हि अंर्तराष्ट्रीय बाजारात सादर केली आहे. Vivo ने एक्स सीरीज मध्ये दोन फोन लॉन्च केले आहेत जे Vivo X30 आणि Vivo X30 Pro नावाने मोबाईल मार्केट मध्ये आले आहेत. चला जाणून घेऊया काय खास आहे या नव्या Vivo X30 series मध्ये.
लुक व डिजाईन
कंपनीने X30 आणि X30 Pro पंच-होल डिस्प्ले डिजाईन वर सादर केले आहेत. कंपनीचा दावा आहे कि फोन मध्ये देण्यात आलेला पंच-होल आता पर्यंतचा सर्वात छोटा पंच-होल आहे ज्याची साईज फक्त 2.98एमएम आहे. विशेष म्हणजे दोन्ही स्मार्टफोनची डिजाईन एकसारखी आहे. फोनच्या डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे.
फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. बॅक पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर एकाच सेटअप मध्ये वर्टिकल शेप मध्ये आहेत तसेच या सेटअपच्या उजवीकडे चौथा सेंसर स्क्वेअर शेप मध्ये आहे. या चोथ्या सेंसरच्या खाली फ्लॅश लाईट आहे. Vivo X30 च्या रियर कॅमेरा सेटअपच्या खाली सेंसर डिटेल पण लिहिण्यात आले आहेत ज्यात ’64MP MEGA-ZOOM’ दिसत आहे. बॅक पॅनल वर खालच्या बाजूला ‘vivo 5G’ पण लिहिण्यात आले आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे.
कॅमेरा डिटेल
Vivo X30 सीरीजच्या कॅमेरा डिपार्टमेंट बद्दल बोलायचे तर Vivo X30 आणि X30 Pro दोन्ही स्मार्टफोन एफ/1.8 अपर्चर असलल्या 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी Samsung GM1 सेंसरला सपोर्ट करतात. तसेच फोन मध्ये 32 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 13 मेगापिक्सलची पेरिस्कोप लेंस देण्यात आली आहे. Vivo X30 Pro मध्ये पेरिस्कोप लेंस 50mm असलेली प्रोफेशनल लेंस देण्यात आली आहे जी 60x झूमला सपोर्ट करते पण Vivo X30 मध्ये हे फीचर नाही.
Vivo X30 सीरीजचे दोन्ही फोन OIS (optical image stabilization) आणि EIS (electronic image stabilization) सारख्या एडवांस फीचर्ससह येतात. फोनचा कॅमेरा सेटअप अल्ट्रा-वाइड 16mm पासून 136mm पर्यंतच्या फोकल लेंथ वर काम करू शकतो. तसेच फोन मध्ये पोर्टरेट फोटो साठी 50एमएम लेंसचा वापर केला गेला आहे. त्याचप्रमाणे सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Vivo X30 आणि X30 Pro मध्ये एफ/2.45 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
स्पेसिफिकेशन्स
Vivo X30 आणि X30 Pro कंपनीने 6.44 इंचाच्या एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च केले आहेत. फोनची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येते. एंडरॉयड आधारित हे स्मार्टफोन्स फनटच ओएस 10 वर सादर केले गेले आहेत जे सॅमसंगच्या एक्सनॉस 980 चिपसेट वर रन चालतात. विशेष म्हणजे सॅमसंग एक्सनॉस 980 5G बेसबॅंड इंटग्रेटेड आहे, जो डुअल मोड 5G (SA / NSA 5G)ला सपोर्ट करतो. या चिपसेट मध्ये कोर्टेक्स ए77 आर्टिेक्चर चा वापर केला गेला आहे. Vivo X30 आणि X30 Pro दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये पावर बॅकअप साठी 4350एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते.
वेरिएंट्स व किंमत
Vivo X30 आणि X30 Pro दोन्ही स्मार्टफोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केले गेले आहेत. Vivo X30 चा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 3298 युआन (जवळपास 33,400 रुपये) आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी मेमरी वेरिएंट 3598 युआन (जवळपास 36,500 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे. तर Vivo X30 Pro चा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटको 3998 युआन (जवळपास 40,500 रुपये) आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी मेमरी वेरिएंट 4298 युआन (जवळपास 43,500 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे.
