Home बातम्या दमदार कॅमेरा असलेले पावरफुल फोन Vivo X60 आणि Vivo X60 Pro भारतात झाले लॉन्च, OnePlus 9 ला मिळणार निश्चित आव्हान

दमदार कॅमेरा असलेले पावरफुल फोन Vivo X60 आणि Vivo X60 Pro भारतात झाले लॉन्च, OnePlus 9 ला मिळणार निश्चित आव्हान

आपल्या शानदार कॅमेरा आणि डिजाइन असलेल्या फोनसाठी प्रसिद्ध Vivo ने आज भारतीय बाजारात आपली ताकदवान सीरीज Vivo X60 सादर केली आहे. चीनमध्ये गेल्यावर्षी लॉन्च झाल्यानंतर या सीरीजच्या फोन्सची भारतात आतुरतेने वाट बघितली जात होती जी आज संपली आहे. कंपनीने वीवो एक्स60 सीरीजमध्ये Vivo X60, Vivo X60 Pro आणि हाई-अँड फीचर्ससह Vivo X60 Pro Plus पण भारतीय टेक मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. तिन्ही फोन मध्ये 5G ची ताकद आहे जी OnePlus 9 सीरीजला चांगलेच आव्हान देईल. पुढे या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला वीवो एक्स 60 आणि वीवो एक्स 60 प्रो बाबत संपूर्ण माहिती देणार आहोत. या फोन्सची माहिती देण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो कि Vivo X60 की स्पेसिफिकेशन जवळपास प्रो मॉडेल प्रमाणेच आहे. पण, बॅटरी क्षमताच्या बाबतीत दोन्ही वेगळे आहेत.

डिजाइन आहे परफेक्ट

स्पेसिफिकेशनच नाही तर Vivo X60 आणि X60 Pro ची डिजाइन पण एकसारखी आहे. दोन्ही फोनच्या फ्रंटला मध्यभागी पंच होल कट-आउट देण्यात आला आहे, ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. त्याचबरोबर दोन्ही फोनच्या कडा बेजल लेस आहेत. फोन्सच्या बॉटमला स्पीकर ग्रिल आणि टाइप-सी पोर्ट आहे. रियर लुक पाहता यात ट्राअँगल शेपमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅशसह ऑप्टिकल लेंस आहे. फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर बटन आणि ऑन-ऑफ बटन आहे. फोनचा रियर आणि फ्रंट दोन्ही बाजूला गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन मिळते.

कॅमेऱ्यात आहे दम

वीवो एक्स60 सीरीजसाठी वीवो इंडियाने zeiss सह भागेदारी केली आहे. दोन्ही फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा प्राइमरी कॅमेरा f/1.79 लेंससह 48 मेगापिक्सलचा आहे, तसेच चार axis ऑप्टिकल इमेज स्टेब्लाइजेशन (OIS) देण्यात आले आहे. कॅमेरा सेटअपमध्ये f/2.2 अल्ट्रा-वाइड लेंससह 13 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलची पोट्रेट लेंस पण आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी दोन्ही फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा f/2.45 लेंससह देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 8GB रॅम, 5000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेर्‍यासह लॉन्च झाला वीवोचा स्वस्त 5G फोन Vivo Y72

5G ची ताकद असलेला प्रोसेसर

दोन्ही फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 870 प्रोसेसरच्या पावरसह येतात. या प्रोसेसरची खास बाब अशी आहे कि यात 5th generation AI Engine सोबतच Hexagon Tensor Accelerator आहे. तसेच, प्रोसेसरमध्ये हेवी गेम खेळता येतील आणि हाइपर रियलिस्टिक ग्राफिक्सची मजा घेत युजर रियल टाइम परफॉर्मन्स ऑप्टिमाइज करता येईल. या प्रोसेसरमध्ये Adreno 650 जीपीयू पण आहे.

डिस्प्ले आहे सुंदर

Vivo X60 आणि X60 Pro मध्ये 6.56 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2376 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात आस्पेक्ट रेशियो 19.8:9, 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि पी3 कलर गामुट सपोर्ट पण आहे. त्याचबरोबर फोनचा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह येतो.

पावरफुल बॅटरी आणि रॅम/स्टोरेज

वीवो एक्स 60 प्रो मध्ये तुम्हाला 4,200 एमएएचची बॅटरी मिळेल, जी 33 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसह येते. तर, एक्स 60 मध्ये 4,300 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जिच्यासोबत तुम्हाला 33 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी पण मिळेल. दोन्ही फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम व 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.

ऑपरेटिंग सिस्टम आणि कनेक्टिवीट फीचर्स

दोन्ही फोन डुअल-सिम (नॅनो) वीवो एक्स60 अँड्रॉइड 11 वर आधारित OriginOS 1.0 वर चालतात. कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून हँडसेटमध्ये 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. यात एक्सीलरोमीटर, एम्बिएंट लाइट सेंसर, जायरोस्कोप, मैग्नेटोमीटर आणि प्रोक्सिमिटी सेंसर देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा : Black Shark 4, Black Shark 4 Pro गेमिंग फोन झाला लॉन्च, यामध्ये आहे 12GB रॅम आणि 144Hz डिस्प्लेसह अनेक वैशिष्ट्ये

किंमत

किंमत पाहता कंपनीने वीवो एक्स60 दोन रॅम व दोन स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर केला आहे. दुसरीकडे वीवो एक्स60 प्रो सिंगल रॅम व स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. Vivo X60 च्या 8GB रॅम व 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 37,990 रुपये व 12GB रॅम व 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 41,990 रुपये आहे. Vivo X60 Pro च्या किंमतीबद्दल बोलायचे तर याचा 12GB रॅम व 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 49,990 रुपये आहे.