Home बातम्या Vivo Y12 ची किंमत असेल 12,490 रुपये, यात आहे ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

Vivo Y12 ची किंमत असेल 12,490 रुपये, यात आहे ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

91मोबाईल्स ने सर्वात आधी बातमी दिली होती कि Vivo लवकरच भारतात आपला नवीन वाय सीरीजचा फोन सादर करू शकते आणि त्यानंतर काही दिवसांनी कंपनीने Y17 लॉन्च केला होता. काही दिवसांपूर्वी आम्ही एक्सक्लूसिव माहिती दिली होती कि कंपनी वाय सीरीज मध्ये Y12 नावाचा स्मार्टफोन सादर करणार आहे. आता हा फोन कंपनी चुपचाप अमेझॉन इंडिया वर सेल करत आहे.

जर तुम्ही हा फोन विकत घेऊ इच्छित असाल तर ऑफलाइन रिटेल स्टोर्स वर Y12 चा 3जीबी रॅम आणि 32जीबी इंटनल स्टोरेज वेरिएंट 12,490 रुपये आणि Y12 चा 4जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट पण 12,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन Aqua Blue कलर ऑप्शन मध्ये विकत घेता येईल. आम्हाला या फोनच्या उपलब्धतेची माहिती ऑफलाइन रिटेलर्स कडून मिळाली आहे.

Vivo Y12 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

फोनचे इतर स्पेसिफिकेशन पाहता यात 6.35-इंचाची एचडी+ स्क्रीन मिळेल. तसेच कंपनीने यात वाटर ड्रॉप नॉच दिली आहे. प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वाला मीडियाटेक एमटी6762 हेलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. फोन मध्ये 2.0 गीगाहट्र्जचा ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

कॅमेऱ्याच्या बाबतीत हा खूप खास आहे. Vivo Y12 मध्ये पण ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. मेन सेंसर 13-मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा सेंसर 8-मेगापिक्सलचा आहे जो वाइड एंगल साठी देण्यात आला आहे. तीसरा सेंसर 2-मेगापिक्सलचा आहे आणि हा डेफ्थ सेंसिंगचे काम करतो. सेल्फी साठी कंपनीने यात 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

वाय सीरीजच्या दुसऱ्या फोन प्रमाणे यात पण तुम्हाला मोठी बॅटरी मिळेल. यात 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. यात फास्ट चार्जिंग सपोर्ट नाही पण रिवर्स चार्जिंग आहे ज्यात तुम्ही या फोनने दुसरा डिवाइस चार्ज करू शकाल. फोन मध्ये डुअल सिम आणि 4जी वोएलटीई सपोर्ट देण्यात आला आहे.