91मोबाईल्सने या आठवड्याच्या सुरवातीला Vivo च्या नवीन स्मार्टफोन Vivo Y19 संबंधित एक एक्सक्लूसिव बातमी दिली होती, ज्यात फोनच्या फुल स्पेसिफिकेशन्स सोबत याच्या किंमतचा खुलासा पण केला होता. आज आम्हाला नवीन अपडेट मिळाला आहे कि Vivo Y19 इंडियन मार्केट मध्ये ऑफिशियली लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन आज पासून देशातील ऑफलाईन बाजार व रिटेल स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध झाला आहे आणि हा स्मार्टफोन 13,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Vivo Y19 लुक
लुकच्या बाबतीत हा स्मार्टफोन अलीकडे अमेझॉन इंडिया वर लिस्ट झालेल्या वीवो यू सीरीजच्या आगामी स्मार्टफान Vivo U20 सारखा आहे. हा स्मार्टफोन बेजल लेस डिस्प्ले वर बनला आहे ज्यात स्क्रीनच्या वरच्या बाजूला ‘वी’ शेप वाली नॉच देण्यात आली आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Vivo Y19 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. कॅमेरा सेटअप मध्ये तीन कॅमेरा सेंसर आणि एक फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. सेटअपच्या खाली ‘AI Triple Camera’ लिहिण्यात आले आहे. फोनच्या रियर पॅनल वर मधोमध फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच खालच्या बाजूला Vivo ची ब्रॅण्डिंग देण्यात आली आहे.
Vivo Y19 स्पेसिफिकेशन्स
फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.53 इंचाच्या फुलएचडी+ हॉलो डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो 3डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. वीवो वाय19 एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच 9.2 ओएस वर लॉन्च झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडच्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी65 चिपसेट वर चालतो. भारतात हा फोन 4 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी सह आला आहे जी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Y19 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.78 अपर्चर वाला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. सोबत हा फोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 8 मेगापिक्सलच्या वाइड ऍंगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर वाल्या 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Vivo Y19 मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Vivo Y19 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर Vivo Y19 फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Vivo Y19 मध्ये 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. Vivo Y19 इंडियन मार्केट मध्ये 13,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.
