Home बातम्या 6.2-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि 3जीबी रॅम सह लॉन्च झाला वीवो वाय81, किंमत फक्त 12,999 रुपये

6.2-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि 3जीबी रॅम सह लॉन्च झाला वीवो वाय81, किंमत फक्त 12,999 रुपये

वीवो बद्दल गेल्या आठवड्यात आम्ही बातमी दिली होती की कंपनी या महिन्यात भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन वाय81 लॉन्च करेल. त्यानुसार आज वीवो ने देशात आपली ‘वाय सीरीज’ पुढे नेत वाय81 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. वीवो ने हा फोन 12,999 रुपयांमध्ये बाजारत आणला आहे जो आॅनलाईन शॉपिंग साइट सोबत आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल

वीवो वाय81 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन पण ट्रेंड मधील 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. फोन मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.2-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड आहे. वीवो वाय81 एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.0 वर सादर झाला आहे सोबतच हा 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक एमटी6762 चिपसेट वर चालतो.

वाय81 3जीबी रॅम सह लॉन्च करण्यात आला आहे फोन मध्ये ग्राफिक्स साठी आईएमजी जीई8320 देण्यात आला आहे. कंपनी ने फोन मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वाय81 च्या बॅक पॅनल वर एलईड फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला तर सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

वीवो वाय81 4जी स्मार्टफोन आहे जो डुअल सिम ला सपोर्ट करतो. बे​सिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 3,260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. वीवो वाय81 देशात विकल्या जाणार्‍या सर्वात स्वस्त नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोंस पैकी एक आहे. हा फक्त 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.