Home बातम्या एक्सक्लूसिव : वीवो वाय83 प्रो होणार आहे भारतात लॉन्च, यात असेल नॉच डिस्प्ले, डुअल कॅमेरा आणि 4जीबी रॅम

एक्सक्लूसिव : वीवो वाय83 प्रो होणार आहे भारतात लॉन्च, यात असेल नॉच डिस्प्ले, डुअल कॅमेरा आणि 4जीबी रॅम

वीवो ने मे महीन्यात भारतीय बाजारात आपला स्वस्त नॉच डिस्प्ले स्मार्टफोन वाय83 सादर केला होता. वीवो वाय83 मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट सह लॉन्च होणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. फक्त 14,990 रुपयांमध्ये आलेल्या या नॉच डिस्प्ले स्मार्टफोनचा आता अजून एक मॉडेल वीवो घेऊन येत आहे. आम्हाला एक्सक्लूसिव बातमी मिळाली आहे की वीवो इंडियन मार्केट मध्ये एक नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन लॉन्च करण्याची योजना बनवत आहे आणि हा स्मार्टफोन वाय83 चा नवीन वर्जन वाय83 प्रो असेल.

91मोबाईल्सला सूत्रांकडून खबर मिळाली आहे की कंपनी देशात आपली वाय स्मार्टफोन सीरीज वाढवणार आहे आणि या सीरीज मध्ये आता वाय83 प्रो स्मार्टफोन लॉन्च करण्यात येईल. हा फोन पण जुन्या मॉडेल प्रमाणे नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात येईल आणि यात 6.22-इंचाचा फुलव्यू डिस्प्ले 2.0 देण्यात येईल. फोन मधील नॉच मध्ये एकीकडे सेल्फी कॅमेरा असेल तर दुसरी कडे सेंसर देण्यात येईल. फोनचा फ्रंट कॅमेरा फेस अनलॉक टेक्नोलॉजी सपोर्ट सोबत येईल.

वीवो वाय83 प्रो ला कंपनी एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.0 सह सादर करेल. या फोन मध्ये 4जीबी रॅम देण्यात येईल तसेच फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर असतील. तसेच सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर 8-मेगापिक्सल चा कॅमेरा असेल.

मिळालेल्या माहितीनुसार वाय83 प्रो मध्ये मीडियाटेक चा चिपसेट असू शकतो. तर पावर बॅकअप साठी कंपनी या फोन मध्ये 3,260एमएएचची बॅटरी देईल. कंपनी वाय83 प्रो येत्या काही आठवड्यांत भारतीय बाजारात लॉन्च करेल. हा फोन ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या सुरवातीला देशात लॉन्च होईल. वीवो वाय83 प्रो ला कंपनी 16,000 रुपयांमध्ये लॉन्च करू शकते. फोनची निश्चित लॉन्च डेट व इतर माहिती लवकरच तुम्हाला देण्यात येईल.