Home बातम्या 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह समोर आला वीवो जेड1आय, लवकरच होऊ शकतो लॉन्च

4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह समोर आला वीवो जेड1आय, लवकरच होऊ शकतो लॉन्च

वीवो बद्दल कालच बातमी आली होती की कंपनी चे दोन नवीन स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर दिसले आहेत. टेना वर वीवो चे हे दोन्ही स्मार्टफोंस वी1730डीटी तसेच वी1803बीए मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आले होते. या लिस्टिंग मध्ये या दोन्ही स्मार्टफोंस चे काही स्पेसिफिकेशन्स शेयर करण्यात आले होते. आज पुन्हा एकदा वीवो च्या नवीन स्मार्टफोन ची माहिती मिळाली आहे. या नवीन लीक मध्ये वीवो च्या आगामी स्मार्टफोन चा फोटो शेयर करण्यात आला आहे आणि याला झेड1आय नाव देण्यात आले आहे.

वीवो झेड1आय चा हा फोटो स्लॅशलीक ने शेयर केला आहे. फोन मध्ये मोठा बेजल लेस डिस्प्ले दाखवण्यात आला आहे विशेष म्हणजे या फोन मध्ये नॉच देण्यात आली नाही. फोन च्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटन देण्यात आले नाही. फोन च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन आहेत. तसेच फोन च्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप असलेला डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. पण बॅक पॅनल वरून फिंगर​प्रिंट सेंसर पण गायब आहे.

लीक नुसार वीवो चा हा फोन 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.2-इंचाच्या मोठया डिस्प्ले सह सादर केला जाईल. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित असेल तसेच क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालेल. लीक नुसार कंपनी कडून या फोन मध्ये 4जीबी रॅम दिला जाईल. फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज सांगण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल.

वीवो झेड1आय च्या बॅक पॅनल वरील डुअल रियर कॅमेरा सेटअप 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल च्या दोन कॅमेरा सेंसर सह येईल, तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये फोन मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा असू शकतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,180एमएएच ची बॅटरी असण्याची शक्यता आहे. लीक मध्ये सांगण्यात आले आहे की हा स्मार्टफोन 1,998 युआन (जवळपास 20,600 रुपये) मध्ये लॉन्च केला जाईल. बोलले जात आहे की वीवो हा फोन अंर्तराष्ट्रीय बाजारा सह लवकरच भारतात पण लॉन्च करेल.