Home बातम्या 4जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज सह लॉन्च झाला 4500एमएएच बॅटरी आणि 32 एमपी सेल्फी कॅमेरा असलेला Vivo Z1x

4जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज सह लॉन्च झाला 4500एमएएच बॅटरी आणि 32 एमपी सेल्फी कॅमेरा असलेला Vivo Z1x

Vivo ने सप्टेंबर मध्ये भारतात आपली ‘Z series’ वाढवत Vivo Z1x स्मार्टफोन लॉन्च केला होता. या सीरीज मध्ये लॉन्च होणारा हा दुसरा स्मार्टफोन होता याआधी कंपनीने पंच-होल डिस्प्ले असलेला Vivo Z1 Pro बाजारात आणला होता. कंपनीने Vivo Z1x 6 जीबी रॅम सह लॉन्च केला होता जो दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध झाला होता. या फोनला अजून पावरफुल बनवत Vivo Z1x चा 8 जीबी रॅम वेरिएंट पण बाजारात आणला आहे. तर आता Vivo Z1x स्वस्त्यात उपलब्द करवून देण्याच्या उद्देशाने Vivo Z1x चा 4 जीबी रॅम वेरिएंट पण भारतात लॉन्च केला आहे.

Vivo Z1x चा नवीन वेरिएंट भारतात लॉन्च झाला आहे. हा वेरिएंट 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीने हा नवीन फोन वेरिएंट 15,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. Vivo Z1x चा 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर लिस्ट झाला आहे जो 14 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या फ्लिपकार्ट च्या ‘मोबाईल बोनान्ज सेल’ मध्ये पहिल्यांदा सेल साठी उपलब्ध होईल. या इस फोन वेरिएंट वर फ्लिपकार्ट 1,000 रुपयांचा डिस्काउंट पण देत आहे.

Vivo Z1x च्या आधीच्या वेरिएंट बद्दल बोलायचे तर हा डिवाईस 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्यतिरिक्त 6 जीबी रॅम व 8 जीबी रॅम सह सेल साठी उपलब्ध आहे. फोनच्या 6 जीबी रॅम + 64 जीबी वेरिएंटची किंमत 16,990 रुपये तर 6 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 18,990 रुपये आहे. तसेच Vivo Z1x चा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने 21,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता.

पावरफुल कॅमेरा

Vivo Z1x कंपनीने रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX582 सेंसर देण्यात आला आहे. यासोबतच हा फोन 8-मेगापिक्सलच्या एआई सुपर वाइड-अँगल आणि 2-मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Vivo Z1x मध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo Z1x स्पेसिफिकेशन्स

Vivo Z1x कंपनीने 6.38-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर केला आहे. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी सह बाजारात आला आहे. कंपनीचा दावा आहे कि हा सेंसर 0.48 सेकंदात फोन अनलॉक करू शकतो. Vivo Z1x एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस वर लॉन्च झाला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 712 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 616 जीपीयू आहे.

Vivo Z1x कंपनीने 6जीबी रॅम वर सादर केला गेला आहे जो बाजारात 64जीबी स्टोरेज आणि 128जीबी मेमरी सह सेल साठी उपलब्ध होईल. Vivo Z1x एक डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी सोबतच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 22.5वॉट फ्लॅशचार्ज टेक्नॉलॉजी असलेली 4,500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार फक्त 5 मिनिटांच्या चार्ज मध्ये 3 तासांचा टॉकटाईम देते. हा फोन फँटम पर्पल आणि फ्यूजन ब्लू कलर मध्ये विकत घेता येईल.