Vivo Z5x बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. अशा आहे कि वीवो हा डिवाइस आपल्या Z सीरीज मध्ये सादर करेल जो कंपनीचा पहिला पंच होल डिजाइन असेलेला हँडसेट असेल. आता पर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार फोन मध्ये 5,000एमएएच ची बॅटरी असेल. तसेच Vivo ने चीनच्या माइक्रोब्लॉगिंग साइट वीबो वर Z5x च्या लॉन्च डेटचा खुलासा केला आहे.
वीबो वर एक ऑफिशियल टीजर जारी केला गेला आहे, ज्यात Z अक्षर लिहिण्यात आले आहे. पोस्टर मध्ये 24 मे 7:30pm (चीनची वेळ) लिहिण्यात आली आहे. यावरून स्पष्ट होते कि कंपनी 24 मे ला आपला फोन लॉन्च करण्यासाठी तयार आहे. ऑफिशियल लॉन्चच्या आधी डिवाइस JD.com वर लिस्ट झाला आहे.
लॉन्च डेट व्यतिरिक्त या पोस्ट मध्ये अपकमिंग Z5x बद्दल कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. याआधी समोर आलेल्या माहिती नुसार हा वीवोचा पहिला स्मार्टफोन असेल जो पंच-होल डिस्प्ले सह येईल. तसेच समोर आलेल्या एका रिपोर्ट नुसार फोन मध्ये पवार बॅकअप साठी एक मोठी 5,000एमएएच ची बॅटरी असेल. फोनच्या बॅटरीच्या क्षमतेबद्दल वीवोच्या प्रोडक्ट मॅनेजर Wu Fang ने सोशल मीडिया वर पोस्ट टीज केली होती. हा डिवाइस कंपनीच्या Vivo Z3X चा अपग्रेडेड वेरिएंट असेल. अफवा अशी आहे कि Vivo Z5x मध्ये 6.53-इंचाचा डिस्प्ले असेल जो फुल एचडी+ रिजोल्यूशन सह येईल.
तसेच Vivo Z5x चीनच्या 3सी सर्टिफिकेशन साइट वर दिसला होता, जिथे समजले होते कि फोन 18W चार्जर सह येईल जो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच Vivo Z5x Geekbench वर पण दिसला होता, जिथे फोनच्या स्पेसिफिकेशन्सची काही माहिती समोर आली होती. लिस्टिंग नुसार फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 एसओसी असेल. या वेरिएंट 8जीबी रॅम सह 1848 स्कोर सिंगल-कोर आणि 5915 मल्टी-कोर टेस्ट मध्ये मिळाले.
JD.com च्या लिस्टिंग नुसार Vivo Z5x 4जीबी रॅम/ 64जीबी स्टोरेज, 6जीबी रॅम/ 64जीबी स्टोरेज, 6जीबी रॅम/ 128जीबी स्टोरेज आणि 8जीबी रॅम/ 128जीबी स्टोरेज सह येईल. तसेच फोन दोन कलर- Extreme Night Black आणि Phantom Black मध्ये लॉन्च केला जाईल. लिस्टिंग मध्ये डिवाइसची इतर माहिती नव्हती.
