Home बातम्या वोडाफोन 159 रुपये, एयरटेल 149 रुपये की जियो 149 रुपये, जाणून घ्या कोणता प्लान आहे तुमच्या साठी बेस्ट

वोडाफोन 159 रुपये, एयरटेल 149 रुपये की जियो 149 रुपये, जाणून घ्या कोणता प्लान आहे तुमच्या साठी बेस्ट

कमी किंमतीत जास्त बेनि​फिट देण्यासाठी टेलीकॉम कंपन्या प्रत्येक आठवड्याला कोणता कोणता तरी नवीन प्लान व आॅफर घेऊन येत असतात. देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल आणि रिलायंस जियो ने आपल्या ग्राहकांसाठी 149 रुपयांचे प्लान सादर केले आहेत जे एका महिन्यासाठी भरपुर डेटा आणि कॉलिंग बेनिफिट देतात. तसेच आता जियो आणि एयरटेल ला टक्कर देण्यासाठी वोडाफोन ने पण 159 रुपयांचा नवीन प्लान आणला आहे. आम्ही या तिन्ही कंपन्यांच्या प्लान एकमेकांशी तुलना केली आहे. बघा एयरटेल, रिलायंस जियो आणि वोडाफोन पैकी तुमच्यासाठी कोणता प्लान बेस्ट आहे.

वोडाफोन 159 रुपये

वोडाफोन ने सादर केलेला हा लेटेस्ट प्रीपेड प्लान आहे जो 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. या प्लान अंतर्गत यूजर्सना रोज 1जीबी इंटरनेट डेटा देण्यात येईल जो 4जी व 3जी च्या स्पीड ने वापरता येईल. वोडाफोन यूजर्सना 159 रुपयांमध्ये एक महिन्यासाठी अनलि​मिटेड नॅशनल वॉयस कॉल मिळतील जे रोमिंग मध्ये पण फ्री असतील. हे वॉयस कॉल प्रतिदिन अधिकतम 250 मिनिटे व प्रति सप्ताह अधिकतम 1000 मिनिटे अशा एफयूपी लिमिट सह येतील. त्याचबरोबर 28 दिवस रोज 100एसएमएस चा वापर पण वोडाफोन यूजर्सना करता येईल.

एयरटेल 149 रुपये

एयरटेल चा हा प्लान पण 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. कंपनी आपल्या या प्लान मध्ये वोडाफोन प्रमाणे 28 दिवस 1जीबी डेटा प्रतिदिन यूजर्स च्या नंबर वर क्रेडिट करते. या डेटा चा वापर पण 4जी व 3जी दोन्ही नेटवर्क वर करता येईल. तसेच 28 दिवस रोज 100एसएमएस यूजर्स च्या नंबर वर क्रेडिट केले जातात. वॉयस कॉल्स बद्दल बोलायचे झाले तर एयरटेल आपल्या ग्राहकांना लोकल, एसटीडी व रोमिंग कॉल 28 दिवसांसाठी पूर्णपणे मोफत देते. एयरटेल च्या या प्लान मध्ये कोणतीही एफयूपी लिमिट नाही म्हणजे यूजर किती पण वेळ वॉयस कॉल करू शकतात.

जियो 149 रुपये

रिलायंस जियो ने सादर केलेला 149 रुपयांचा प्लान 28 दिवसांसाठी वैध आहे. डेटा पाहता जियो आपल्या यूजर्सना 28 दिवस रोज 1.5जीबी इंटरनेट डेटा देत आहे. या प्लान मध्ये मिळणारा डेटा वोडाफोन आणि एयरटेल च्या डेटा पेक्षा जास्त आहे. तसेच दुसरीकडे हे पण महत्त्वाचे आहे की जियोच्या डेटा चा वापर फक्त 4जी नेटवर्क वर केला जाऊ शकतो. जियो आपल्या प्लान मध्ये रोज 100 एसएमएस आणि कोणत्याही एफयूपी लिमिट वीना अनलिमिटेड वॉयस कॉलिंग ची सुविधा देत आहे.