Categories: बातम्या

वोडफोन रेड प्लानच्या अंतर्गत येतील Vodafone Idea चे पोस्टपेड प्लान

टेलीकॉम इंडस्ट्री मध्ये गेले काही दिवस आपले नवीन प्लान्स सादर करणाऱ्या वोडाफोन आइडियाने गुरुवारी एक नवीन घोषणा केली आहे. या घोषणेत कंपनीने माहिती दिली आहे कि आता कंपनीचे सर्व पोस्टपेड प्लान आणि सर्विस वोडाफोन रेड ब्रॅंडिंगच्या आत येतील. याचा अर्थ असा कि दोन्ही कंपन्यांचे सर्व पोस्टपेड प्लान वोडाफोन रेड प्लानच्या अंतर्गत येतील.

याचा अर्थ असा कि तुम्ही आतापर्यंत आइडियाचा एखादा निर्वाणा पोस्टपेड प्लान वापरत असला तर तुम्हाला थेट वोडाफोन रेड प्लान मध्ये रूपांतरित होतील. याबाबत कंपनीने सांगितले आहे कि हा बदलाव एंटरप्राइज आइडिया पोस्टपेड ग्राहकांना पण लागू होईल.

दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2019 मध्ये वोडाफोन आणि आइडिया सेल्युलरने भागेदारी केली होती. वोडाफोन आइडियाने या घोषणेच्या वेळी अशी माहिती दिली आहे कि सर्कल्सनुसार वोडाफोन रेड पोस्टपेड प्लान Vodafone आणि Idea च्या प्रत्येक स्टोर आणि डिजिटल चॅनेल वर यूजर्स साठी उपलब्ध होतील.

या बदलाची सुरवात मुंबई पासून होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्यांत हे देशातील इतर भागांत लागू करण्यात येईल. वोडाफोन आइडियाने स्पष्ट केले आहे कि दोन्ही कंपन्यांचे प्रीपेड प्लान आधीप्रमाणे वेगवेगळे ब्रॅंडिंग अंतर्गत उपलब्ध होतील.

वोडाफोन आइडियाने काही दिवसांपूर्वी आईफोन फॉर-एवर प्लान बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हा प्लान को कंपनीने पोस्टपेड यूजर्स साठी सादर केला होता, ज्याची किंमत 649 रुपये होती. RED iPhone Forever नावाचा हा प्लान फक्त आईफोन यूजर्ससाठी होता.

वोडाफोन इंडियाचे प्रवक्ते म्हणाले कि “15 जानेवारी 2020 पासून आईफोन फॉर-एवर प्रोग्राम बंद केला जाईल. ज्या ग्राहकांनी या योजनेत सहभाग घेतला नाही त्यांना 31 जानेवारी 2020 पर्यंत नोंदणी करण्याची संधी दिली जाईल. ज्या ग्राहकांनी नोंदणी केली आहे त्यांना वर्षभर या योजनेचा लाभ घेता येईल.

Published by
Siddhesh Jadhav