Home बातम्या Jio-Airtel च्या ग्राहकांनंतर Vi वापरकर्त्यांवर कोसळला दुःखाचा डोंगर, एवढे महाग झाले रिचार्ज प्लॅन

Jio-Airtel च्या ग्राहकांनंतर Vi वापरकर्त्यांवर कोसळला दुःखाचा डोंगर, एवढे महाग झाले रिचार्ज प्लॅन

रिलायन्स जिओ आणि एअरटेलनंतर आता देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनीने आपल्या ग्राहकांना काळजीत टाकले आहे. वास्तविक, शुक्रवारी संध्याकाळी उशिरा व्होडाफोन आयडियाने दर वाढवण्याची घोषणा केली आहे. जिओ-एअरटेल प्रमाणे व्हीआय ने देखील प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही प्लॅनसाठी दर वाढवण्याची घोषणा केली आहे. तथापि, दोन्ही टेलिकॉम कंपन्यांच्या विपरीत, व्हीआय चे नवीन प्लॅन 3 जुलैपासून नाही तर 4 जुलैपासून लागू केले जातील.

Vi ने वाढवल्या 21 टक्क्यांपर्यंत किमती

सध्याच्या प्लॅनची किंमत लाभ (अनलिमिटेड व्हाईस आणि एसएमएस प्लॅन) वैधता  नवीन प्लॅनची किंमत (रुपये)
179 रुपये 2 GB डाटा, अनलिमिटेड कॉलिंग, 300 SMS 28 दिवस 199 रुपये
459 रुपये 6 GB डाटा, अनलिमिटेड कॉलिंग, 300 SMS 84 दिवस 509 रुपये
1799 रुपये 24 GB डाटा, अनलिमिटेड कॉलिंग, 300 SMS 365 दिवस 1999 रुपये
269 रुपये 1 GB/day डाटा, अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS 28 दिवस 299 रुपये
299 रुपये 1.5 GB/day डाटा, अनलिमिटेड डाटा (12am to 6am) वीकएंड डाटा रोलओवर, डाटा डेलाइट, अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS रोज 28 दिवस 349 रुपये
319 रुपये 2 GB/day डाटा, अनलिमिटेड डाटा (12am to 6am) वीकएंड डाटा रोलओवर, डाटा डेलाइट, अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS रोज 1 महिना 379 रुपये
479 रुपये 1.5 GB/day डाटा, अनलिमिटेड डाटा (12am to 6am) वीकएंड डाटा रोलओवर, डाटा डेलाइट, अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS रोज 56 दिवस 579 रुपये
539 रुपये 2 GB/day डाटा, अनलिमिटेड डाटा (12am to 6am) वीकएंड डाटा रोलओवर, डाटा डेलाइट, अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS रोज 56 दिवस 649 रुपये
719 रुपये 1.5 GB/day डाटा, अनलिमिटेड डाटा (12am to 6am) वीकएंड डाटा रोलओवर, डाटा डेलाइट, अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS रोज 84 दिवस 859 रुपये
839 रुपये 2 GB/day डाटा, अनलिमिटेड डाटा (12am to 6am) वीकएंड डाटा रोलओवर, डाटा डेलाइट, अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS रोज 84 दिवस 979 रुपये
2899 रुपये 1.5 GB/day डाटा, अनलिमिटेड डाटा (12am to 6am) वीकएंड डाटा रोलओवर, डाटा डेलाइट, अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS रोज 365 दिवस 3499 रुपये
19 रुपये एकूण 1 GB 1 दिवस 22 रुपये
39 रुपये एकूण 2 GB 1 दिवस 48 रुपये

 

व्होडाफोन आयडिया या दूरसंचार सेवा प्रदात्याने प्लॅनमध्ये 10 ते 21 टक्क्यांपर्यंत मोठी वाढ केली आहे. त्याच वेळी एअरटेलने दरात 10 ते 21 टक्क्यांनी वाढ केली आहे. तसेच, जिओने प्लॅनच्या किमती 25 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.

Vodafone Idea प्रीपेड प्लॅनच्या नवीन आणि जुन्या किमती

वरील तक्त्यातमध्ये तुम्ही नवीन किमतींसह व्हीआय चे प्लॅन पाहू शकता. त्याच वेळी व्होडाफोन आयडिया ने डेटा ॲड-ऑन व्हाऊचर 19 रुपयांवरून 22 रुपयांपर्यंत वाढवले आहे. हे एअरटेलने ग्राहकांना दिलेल्या ऑफरप्रमाणेच आहे. याशिवाय 719 रुपये आणि 839 रुपयांच्या प्लॅनची किंमत 859 रुपये आणि 979 रुपये असेल. जे एअरटेलच्या ऑफर सारखेच दर आहेत. Vi सध्या 5G ऑफर करत नाही. तथापि, ते वापरकर्त्यांना Vi Hero Unlimited चे फायदे देत आहे. ज्या अंतर्गत यूजर्सला अनेक डेटा चे फायदे मिळतात.

Vodafone Idea पोस्टपेड प्लॅनच्या नवीन आणि जुन्या किंमती

सध्या प्लॅनची किंमत (रुपये) लाभ (अनलिमिटेड व्हाईस आणि एसएमएस प्लॅन) वैधता (दिवस) नवीन प्लॅनची किंमत (रुपये)
401 1 कनेक्शन: 200GB डाटा रोलओवर सोबत 50GB डाटा, अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग, अनलिमिटेड नाईट डाटा, 3000 SMS, एक कॉम्प्लिमेंट्री ओटीटी अ‍ॅपचे सब्सक्रिप्शन bill cycle 451
501 1 कनेक्शन: 200GB रोल-ओवर के साथ 90GB डाटा, अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग, अनलिमिटेड नाईट डाटा, 3000 SMS, 2 कॉम्प्लिमेंट्री ओटीटी अ‍ॅपचे सब्सक्रिप्शन bill cycle 551
फॅमिली 601 2 कनक्शनचे परिवार; रोल-ओवर सोबत 70GB प्राईमरी + 40GB डाटा सेकेंडरी, अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग, अनलिमिटेड नाईट डाटा, 3000 SMS, 2 कॉम्प्लिमेंट्री अ‍ॅपचे सब्सक्रिप्शन bill cycle फॅमिली 701
फॅमिली 1001 4 कनेक्शनचा परिवार; रोल-ओवर सोबत 140GB प्राईमरी + 40GB डाटा सेकेंडरी, अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग, अनलिमिटेड नाईट डाटा, 3000 SMS, 2 कॉम्प्लिमेंट्री अ‍ॅपचे सब्सक्रिप्शन bill cycle फॅमिली 1201