वोडाफोन-आयडिया (Vi) अनेक दिवसांपासून आपल्या पोस्टपेड ग्राहकांसोबतच प्रीपेड ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्लान सादर करत असते. तसेच, Vi आपल्या स्वस्त आणि अनोख्या पोस्टपेड प्लानसाठी ओळखल्या जाणाऱ्या ऑपरेटर्स पैकी एक आहे. व्यक्तीगत ग्राहकांसाठी वोडाफोन आयडियाकडे अनेक पोस्टपेड प्लान आहेत, ज्यात अनेक प्रकारचे लाभ मिळतात. पण, आता समोर आलेल्या बातमीनुसार पोस्टपेड ग्राहकांना थोडा झटका लागू शकतो कारण Vi ने आता 598 रुपये आणि 749 रुपयांच्या पोस्टपेड प्लानच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ केली आहे.
वोडाफोन आयडियाचे RED फॅमिली प्लान आधी 598 रुपयांपासून सुरु होत होते. प्राइस रिवीजन नंतर या प्लानची सुरवाती किंमत 649 रुपये झाली आहे. 598 रुपयांच्या प्लानची किंमत 649 रुपये झाली आहे, तर 749 रुपयांच्या रेड फॅमिली प्लानची किंमत आता 799 रुपये झाली आहे. हाइकच्या आधी त्या सर्व सर्कल्स मध्ये प्रभावी आहे जिथे वोडाफोन आयडिया RED फॅमिली प्लान उपलब्ध करवून देते.
649 Vi RED फॅमली S प्लान (आधीच्या 598 रुपयांच्या) मध्ये 80GB डेटा मिळतो. तसेच, भारतात कोणत्याही नेटवर्क वर अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि एक महिन्यासाठी 100 एसएमएस पण मिळतात. 80GB डेटा लाभ दोन कनेक्शन्स मध्ये विभागला जातो- प्राथमिक कनेक्शनला 50GB डेटा लाभ मिळतो, तर दुसऱ्या कनेक्शन मध्ये 30GB डेटा मिळतो.
799 रुपयांच्या फॅमिली एम पोस्टपेड प्लान मध्ये एक महिन्यासाठी 120GB डेटाचा लाभ, अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतात. तसेच, 799 रुपयांच्या पोस्टपेड प्लान मध्ये तीन कनेक्शन देण्यात आले आहेत आणि डेटा लाभ प्राथमिक कनेक्शनसाठी 60GB आणि दुसऱ्या कनेक्शनमध्ये 30GB प्रमाणे डिवाइड केला गेला आहे.
