Home बातम्या Vodafone idea यूजर्सना मोफत मिळत आहे 3GB डेटा, अशाप्रकारे करा चेक

Vodafone idea यूजर्सना मोफत मिळत आहे 3GB डेटा, अशाप्रकारे करा चेक

Vodafone Idea ने काही दिवसांपूर्वी आपले नाव रीब्रँड करून Vi असे नाव दिले आहे. नाव बदलण्यासोबतच कंपनीचा प्रयत्न एयरटेल आणि रिलायंस जियोच्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा आहे. यासाठी Vi ने अलीकडेच अनेक प्लान मध्ये ZEE5 प्रीमियम मेंबरशिप फ्री देण्याची घोषणा केली होती. तसेच आता कंपनी आपल्या प्रीपेड यूजर्सच्या अकाउंट मध्ये 3GB फ्री डेटा क्रेडिट करत आहे, ज्याचा लाभ यूजर्स 3 दिवस घेऊ शकतात.

टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार काही यूजर्सना वोडाफोन अकाउंट मध्ये फ्री 3 जीबी डेटा मिळत असल्याची माहिती दिली आहे. Vi ने 3 जीबी डेटा बेनिफिट पूर्णपणे रँडम आहेत. त्यामुळे कदाचित तुम्हाला हि ऑफर मिळणार नाही. MPCG, गुजरात आणि मुंबई समवेत अनेक सर्कल्सच्या यूजर्सनी हि माहिती शेयर केली आहे.

विशेष म्हणजे 49 रुपयांच्या All Rounder पॅकने रिचार्ज केल्यावर Vi 3जीबी फ्री डेटा देत आहे. हा रिचार्ज पॅक 38 रुपये टॉक टाइम, 100एमबी डेटा आणि 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. पण वर सांगितल्याप्रमाणे हि ऑफर नेमक्याच यूजर्सना दिली जात आहे.

तसेच अलीकडेच कंपनीने नवीन आणि खास ऑफर अंतर्गत निवडक प्लान्स मध्ये प्री-पेड ग्राहकांना एक वर्षासाठी झी5 चे नि:शुल्क सब्सक्रिप्शन देत आहे. हि सुविधा एकूण 5 प्लान्स मध्ये दिली जात आहे, यांची किंमत 355 रुपये, 405 रुपये, 595 रुपये, 795 रुपये आणि 2,595 रुपये आहे.

कंपनीच्या या अनोख्या ऑफर अंतर्गत वोडाफोन आइडियाच्या निवडक प्लानच्या ग्राहकांना 12 भाषांमध्ये झी5 चे कंटेंट वर्षभरासाठी नि:शुल्क मिळेल.