Home बातम्या Vodafone यूजर्सना रोज 1 वर्षापर्यंत फ्री मिळेल 1.5जीबी डेटा, बघा कसे ते

Vodafone यूजर्सना रोज 1 वर्षापर्यंत फ्री मिळेल 1.5जीबी डेटा, बघा कसे ते

टेलिकॉमक्षेत्रात वाढत असेलेला डेटा वॉर संपतच नाही आहे. आता पर्यंत अनेक कंपन्या आपल्या नवीन प्लान सह यूजर्सना आकर्षित करण्याचे प्रयत्न करत आहेत. Vodafone ने पण आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर सादर केली आहे. वोडाफोन ने सिटीबॅंक सह भागेदारी करून एक स्पेशल ऑफर सादर केली आहे, ज्या अंतर्गत एक वर्षापर्यंत वोडाफोन यूजर्सना रोज 1.5जीबी डेटा मिळेल.

इतकेच नाही तर यूजर्सना 1.5जीबी डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा पण मिळेल. या ऑफर बद्दल सर्वात आधी टेलीकॉमटॉक ने माहिती दिली होती. ऑफर कंपनीच्या वेबसाइट वर लिस्ट आहे. जर तुम्ही हि ऑफर घेऊ इच्छित असाल तर यासाठी तुम्हाला वोडाफोनच्या वेबसाइट वर जावे लागेल.

ग्राहकांना सिटीबॅंकच्या क्रेडिट कार्ड साठी वोडाफोनच्या वेबसाइट वर जाऊन अप्लाय करावे लागेल. कार्ड मिळाल्यानंतर 30 दिवसांत यूजर्सना क्रेडिट कार्ड द्वारे 4000 रुपये खर्च करावा लागेल, त्यांनतर त्यांना 365 दिवस अनलिमिटेड कॉलिंग आणि 1.5GB डेटाची सुविधा सिम वर मिळेल. या ऑफरचा फायदा 31 जुलै 2019 पर्यंतच घेता येईल.

या ऑफरचा लाभ दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, मुंबई, बेंगलुरु, पुणे, हैद्राबाद, कोलकत्ता, अहमदाबाद, सिकंदराबाद, चेन्नई, वडोदरा, कोईम्बतूर, जयपुर आणि चंदिगढचे ग्राहक घेऊ शकतात. तसेच या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 23 वर्ष असणे आवश्यक आहे.

अलीकडेच आयडिया यूजर्स साठी पण अगदी अशीच ऑफर लॉन्च करण्यात आली होती. या ऑफर मध्ये पण यूजर्सना 365 दिवसांच्या वॅलिडिटी सह रोज 1.5जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे.