आजच्या वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात विविध क्लाऊड स्टोरेज स्पेसद्वारे तुमचा डिजिटल डेटा संग्रहित करणे सोपे झाले आहे. असे असूनही एक्स्टर्नल ड्राईव्ह खूप उपयुक्त आहेत. या सीरीजमध्ये वेस्टर्न डिजिटल कंपनीने आपल्या सॅनडिस्क पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. ज्या अंतर्गत एक्स्टर्नल डेस्कटॉप सॉलिड स्टेट ड्राईव्ह (SSD) लाँच करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे ब्रँडने प्रथमच 8TB पर्यंतचे स्टोरेज असलेले ड्राईव्ह सादर केले आहेत. ज्याच्या मदतीने कन्टेन्ट क्रिएटर आणि व्यावसायिक त्यांचे फोटो, व्हिडिओ आणि इतर डेटा उच्च रिझोल्यूशन मध्ये सहजपणे सेव्ह करू शकतात. चला, पुढे नवीन डेस्कटॉप SSD ची किंमत, प्री-ऑर्डर आणि फिचर्सचे तपशील जाणून घेऊ या.
सॅनडिस्क डेस्क ड्राईव्हची वैशिष्ट्ये
क्षमता: फोटो आणि व्हिडिओ संग्रहण, CAD फाईल्स किंवा 3D रेंडर, मोठ्या AI- जनरेटेड फाईल्स, संगीत लायब्ररी, महत्त्वाचे दस्तऐवज आणि इतर कोणत्याही डेटासाठी 4TB आणि 8TB ची क्षमता प्रदान केली आहे.
परफॉर्मन्स: 8K व्हिडिओंसारख्या सर्वात मोठ्या फायलींसाठी देखील जलद कन्टेन्ट एक्सेस, 1,000 MB/s पर्यंतच्या रिड स्पीडसह ते डेस्कटॉप HDD 3 च्या तुलनेत 4 पट वेगवान आहे.
बॅकअप: ऍपल टाइम मशीन वापरून SSD स्पीडसह फोटो, व्हिडिओ आणि फाईल्सचा त्वरीत बॅकअप घेतला जाऊ शकतो. तसेच वेस्टर्न डिजिटल बॅकअप सॉफ्टवेअरसाठी समाविष्ट असलेले डाऊनलोड करण्यायोग्य Acronis True Image सह स्वयंचलित बॅकअप घेतला जाऊ शकतो.
डिझाईन: या ड्राईव्हमध्ये कॉम्पॅक्ट आधुनिक शैलीची आहे, जिला 2024 रेड डॉट डिझाइन पुरस्कार प्राप्तकर्ता म्हणून मान्यता मिळाली आहे. हे डिव्हाईस डेस्कचा स्पेस वाढवते आणि कोणत्याही व्यावसायिक किंवा घरगुती सेटिंगमध्ये ते नैसर्गिक वाटते.
कंपॅटीबिलिटी: या ड्राईव्हमध्ये समाविष्ट असलेला यूएसबी टाईप-सी टीएम केबलचा वापर करून एक्सएफएटी फॉरमॅटिंगसह विंडोज किंवा मॅकओएस सह काम करतो.
सॅनडिस्क डेस्क ड्राईव्हची किंमत आणि ऑफर
- तीन वर्षांच्या मर्यादित वॉरंटीसह 4TB सॅनडिस्क डेस्क ड्राईव्ह 39,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर 8TB SanDisk Desk Drive ची किंमत 72,999 रुपये आहे. हे वेस्टर्न डिजिटल स्टोअर्स आणि अधिकृत सॅनडिस्क रिटेल स्टोअर्स, ई-टेलर्स आणि वितरकांकडून खरेदीसाठी उपलब्ध आहे.
- ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास तुम्ही 8TB SanDisk Desk SSD ची प्री-ऑर्डर केल्यास, तुम्हाला 1TB SanDisk पोर्टेबल SSD मोफत मिळेल. त्याचवेळी, 4TB प्री-ऑर्डर केल्यावर, 512GB SanDisk Ultra Dual Drive Luxe USB Type-C मोफत दिला जाईल.
