WhatsApp अनेक दिवसांपासून काही अश्या फीचर्स वर काम करत आहे जो युजर्ससाठी चॅटिंग अजून मजेदार बनवेल. यातील एक ‘Disappearing Messages’ फीचर आहे, ज्यावर कंपनीद्वारे काम केले जात आहे. लवकरच हा फीचर रोल आउट केली जाणार असल्याची आशा आहे. त्याआधी Wabetainfo ने माहिती दिली आहे कि आगामी अपडेट सह हा फीचर लवकरच रिलीज केला जाईल. तसेच डिसअपीयरिंग मेसेज फीचर येण्याआधी याच्या एका महत्वाच्या आणि मोठ्या माहितीचा खुलासा झाला आहे.
एफएक्यू पेज वर उपलब्ध माहिती सर्वप्रथम व्हाट्सऍप बीटा ट्रॅकर WABetaInfo ला दिसली होती. सूत्रांच्या माहितीनुसार जर चॅट 7 दिवस तुम्ही उघडली नाही तर मेसेज गायब होतील. पण जर तुम्ही नोटिफिकेशन पॅनल क्लियर केला नसेल तर तुम्ही ते मेसेज चेक करू शकाल.
‘Disappearing Messages’ कस्टमाइज करण्याचा ऑप्शन पण युजर्सना मिळणार नाही. हा फीचर एकदा इनेबल केल्यानंतर, सर्व नवीन मेसेज 7 दिवसानंतर एक्सपायर होतील. म्हणजे युजर्स आपल्या सोयीनुसार मेसेज गायब करण्याचा टाइम सेट करू शकत नाहीत.
हे देखील वाचा :सोप्पे आहे Whatsapp मधील सीक्रेट चॅट लपवणे, फॉलो करा या स्टेप्स
व्हाट्सऍपने नोट केले आहे कि नवीन फीचर तुम्ही पाठवलेल्या मेसेजेसना प्रभावित करणार नाही. Disappearing Messages फीचर लवकरच iOS, एंडरॉयड, KaiOS आणि वेब/डेस्कटॉप युजर्ससाठी सादर केला जाईल.
खास बाब अशी आहे कि व्हाट्सऍप युजर्स डिसअपीयरिंग मेसेज फॉरवर्ड करण्यासोबतच स्क्रीनशॉट पण घेऊ शकतील. युजर्स डिसअपीयरिंग फोटोज आणि व्हिडीओ गॅलरी मध्ये सेव करता येतील. यासाठी Save to Camera Roll ऑप्शन दिला जाईल, जो मॅन्युअली इनेबल करावा लागेल.
