Home बातम्या 30 ऍप्रिल नंतर या फोन्स मध्ये चालणार नाही Facebook आणि Instagram, तुमचा फोन आहे का या लिस्ट मध्ये

30 ऍप्रिल नंतर या फोन्स मध्ये चालणार नाही Facebook आणि Instagram, तुमचा फोन आहे का या लिस्ट मध्ये

सोशल मीडिया विश्वातली दिग्गज कंपनी फेसबुक आपल्या काही ऍप्सचा सपोर्ट विंडोज फोन प्लॅटफॉर्म वर बंद करण्याचे प्लानिंग करत आहे. कंपनी 30 ऍप्रिल नंतर अनेक विंडोज फोन वर फेसबुक, इंस्टाग्राम आणि मेसेंजर ऍप चालणार नाहीत. अशी माहिती माइक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

सर्वात आधी हि बातमी एनगॅजेट वर दिसली होती, नंतर माइक्रोसॉफ्टने स्वतःहून स्पष्ट केले आहे. पण व्हाट्सऍप बद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही कि कंपनी व्हाट्सऍप सपोर्ट पण विंडोज फोन वरून काढून टाकेल कि नाही.

कारण व्हाट्सऍप फेसबुकच्या मालकीचे आहे. त्यात आधीच माइक्रोसॉफ्ट विंडोज फोन प्लॅटफॉर्म बंद झाला आहे आणि आता कोणत्याही फोन मध्ये विंडोज ओएस मिळत नाही. पण अजूनही काही यूजर्स आहेत जे विंडोज फोन प्लॅटफॉर्म वापरत आहेत.

जर तुमच्याकडे पण विंडोज 10 प्लॅटफॉर्म वर चालणारा फोन असेल तर त्यात इंस्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर ओपन केल्यावर एक मेसेज येईल. मेसेज मध्ये लिहून येईल कि हा ऍप या फोन मध्ये 30 ऍप्रिलला बंद होईल. हा मेसेज सर्वात आधी रेडिट यूजर ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर बघितला होता.

पण तुम्ही थर्ड पार्टी ऍप्सच्या मदतीने फेसबुक, इंस्टाग्राम आणि मेसेंजरचा वापर करू शकता. याआधी कंपनीने व्हाट्सऍप सपोर्ट पण अनेक फोन्स मध्ये बंद केला आहे. याचा थेट अर्थ असा निघतो कि वेळेनुसार कंपनीला यूजर्सनी नवीन फोन वापरावे असे वाटते.