Categories: Featured

व्हाट्सऍप वरील पॉर्न ग्रुपच्या ऍडमिनला अटक, मुबंई पोलीसांनी केली कारवाई

व्हाट्सऍप आजकाल कोणताही मीडिया कंटेंट लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त लोकांना मेसेज मधून पाठवण्याचे सोप्पे साधन आहे. टेक्स्ट मेसेज सोबतच फोटो, वीडियो, आॅडियो, जीफ व पीडीएफ सारख्या फाइल्स व्हाट्सऍप वर अगदी सहज कोणत्याही अतिरिक्त चार्जविना पाठवल्या जातात. पसर्नल चॅट सोबत व्हाट्सऍप ग्रुप्स मुळे एकाच वेळी अनेकांना मेसेज पाठवता येतात. तसेच ग्रुप्स मध्ये पॉर्न कंटेंट म्हणजे अश्लील मीडिया पण पाठवले जातात हे सर्वांनाच माहित आहे. व्हाट्सऍप संबंधित अशीच एक घटना समोर आली आहे ज्यात मुंबई मधील युवकाला पॉर्न ग्रुपचा ऍडमिन असल्यामुळे अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलीसांनी व्हाट्सऍप वर अश्लील कंटेंट शेयर करण्याच्या आरोपाखाली एका 24 वर्षीय युवकाला अटक केली आहे. हा तरुण मुंबईच्या धारावी मध्ये राहणार आहे ज्याचे नाव मुश्ताक अली शेख आहे. हा तरुण एका अशा व्हाट्सऍप ग्रुपचा ऍडमिन आहे ज्याचे नाव ‘Triple XXX’ आहे. या तरुणावर व्हाट्सऍप ग्रुप मधून पॉर्न कंटेंट/ अश्लील मीडिया शेयर करण्याचा आरोप आहे ज्यात नग्न फोटोज आणि अश्लील वीडियोज सामील आहेत.

porno

व्हाट्सऍप ग्रुप ऍडमिनला मु​बंई पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून पकडले आहे. महिलेने पोलीसांमध्ये तक्रार केली होती कि त्यांना एका व्हाट्सऍप ग्रुप मध्ये अनिल करण्यात आले होते ज्याचे नाव ‘Triple XXX’होते. महिलेनुसार आधी त्यांना वाटले कि त्यांचा एखादा मित्र मस्करी करत आहे. पण जेव्हा त्या ग्रुप मध्ये न्यूड फोटो व पॉर्न वीडियो शेयर होऊ लागले तेव्हा धक्का बसला.

पॉर्न कंटेंट ग्रुप मध्ये आल्यानंतर त्यांनी बघितले कि त्या ग्रुप मध्ये यांच्याव्यतिरिक्त 12 लोक अजून होते. ग्रुप ऍडमिन सह या सर्व 12 लोकांचे नंबर त्या महिलेकडे सेव नव्हते आणि ती महिला त्यापैकी कुणालाही ओळखत नव्हती. त्यामुळे त्या महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. गेल्या गुरुवारी पोलिसांनी ग्रुप ऍडमिन मुश्ताक अली शेखला अटक केली. तापसांतर्गत मुश्ताक ने सांगितले कि त्याने त्या महिलेला आपला नातेवाईक समजून ग्रुप मध्ये ऍड केले होते आणि त्याला माहिती नव्हते कि तो नंबर त्या महिलेचा आहे ते.

व्हाट्सऍप ग्रुप ऍडमिन ने सांगितले कि त्या महिलेचा नंबर त्याच्या मोबाईलमध्ये कसा आला हेदेखील त्याला माहित नाही. पोलीस त्यांचं काम करतीलच पण या घटेनमुळे पुन्हा एकदा भारतातील पॉर्नोग्राफी तसेच व्हाट्सऍपच्या नियमांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. मुश्ताकचा फोन डेटा काढून लॅब मध्ये पाठवण्यात आला आहे आणि आरोप सिद्ध झाल्यास व्हाट्सऍप ग्रुप ऍडमिनला आईटी एक्स, 2000 अंतर्गत 5 वर्षांची कैद होऊ शकते. तसेच अशी चूक पुन्हा झाल्यास ग्रुप ऍडमिनला 7 वर्षांची कैद आणि 10,00,000 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

Published by
Siddhesh Jadhav