Home बातम्या फक्त 17 मिनिटांत फुल चार्ज होतील 4000एमएएच बॅटरी असलेले Xiaomi स्मार्टफोन, कंपनीने लॉन्च केली 100W चार्जिंग टेक्नोलॉजी

फक्त 17 मिनिटांत फुल चार्ज होतील 4000एमएएच बॅटरी असलेले Xiaomi स्मार्टफोन, कंपनीने लॉन्च केली 100W चार्जिंग टेक्नोलॉजी

एकेकाळी हाईएंड स्पेसिफिकेशन्स असलेल्या स्मार्टफोन्स साठी मोठी रक्कम दयावी लागत होती, पण आता प्रगत टेक्नॉलॉजीने ताकदवान स्पेसिफिकेशन्स मीड बजेट मध्ये आणले आहेत. आधी मोठी बॅटरी असलेले निवडक स्मार्टफोन्स बाजारात होते. पण आता 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5,000एमएएच पर्यंतची बॅटरी असलेले स्मार्टफोन्स मिळतात. मोठी बॅटरी तर जवळपास सर्व फोन्स मध्ये मिळू लागली आहे पण हि मोठी बॅटरी चार्ज करणे हि पण वेगळी कसरत असते. कमी वेळात जास्त बॅटरी चार्ज करण्यासाठी अनेक कंपन्यांनी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीचा शोध लावला आहे आणि या लिस्ट मध्ये Xiaomi चा समावेश पण झाला आहे. Xiaomi ने अशी टेक्नॉलॉजी सादर केली आहे जिने 4,000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 17 मिनिटांत फुल चार्ज होईल.

100W Super Charge

Xiaomi ने आपली नवी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी 100W Super Charge Turbo charging technology च्या रूपात सादर केली आहे. सर्वात आधी काही दिवसांपूर्वी Vivo ने 120W Super Flash Fast charging टेक्नॉलॉजी सादर केली होती आणि आता Xiaomi ची चार्जिंग टेक्नॉलॉजी Vivo टेक्नॉलॉजीला टक्कर देईल. Xiaomi च्या या टेक्नॉलॉजीचा वापर यूएसबी टाईप-सी केबल द्वारे करता येईल.

17 मिनिटांत फुल चार्ज

100W Super Charge Turbo charging technology सादर करत Xiaomi ने दावा केला आहे कि या टेक्नॉलॉजी द्वारे 4,000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 17 मिनिटांत फुल चार्ज करता येईल. तर Vivo च्या 120W charging technology पाहता हि शाओमीपेक्षा काही पाऊले पुढे आहे आणि 4000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 13 मिनिटांत फुल चार्ज करते.

फोन लॉन्च होईल पुढच्यावर्षी

Xiaomi ने 100W Super Charge Turbo charging technology टेक विश्वासमोर ठेवताना हि टेक्नोलॉजी कोणत्या कॅटेगरीत आणि कोणत्या बजेट रेंजच्या स्मार्टफोन्सना सपोर्ट करेल याची माहिती दिली नाही. पण रिपोर्ट्स मध्ये असे समोर आले आहे कि हि टेक्नॉलॉजी असलेले Xiaomi स्मार्टफोन पुढच्यावर्षी म्हणजे 2020 च्या सुरवातीला किंवा मध्यात बाजारात येतील.

Vivo Super FlashCharge 120W पाहता 4,000एमएएच बॅटरीचा स्मार्टफोन या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून फक्त 5 मिनिटांत 0 ते 50 टक्के चार्ज केला जाऊ शकतो. या एडवांस टेक्नॉलॉजी बद्दल बोलायचे तर Super FlashCharge नवी चार्ज पंप टेक्नॉलॉजी द्वारे 120W (20V/6A) पर्यंतच्या स्पीडने फोन चार्ज करते. हि टेक्नॉलॉजी कंपनीच्या अडॅप्टर आणि यूएसबी टाईप-सी केबल सोबत काम करते. तसेच बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (BMS) चार्जिंगच्या वेळी वीज वोल्ट कंट्रोल करून बॅलेंस करते.