शाओमीने गेल्या महिन्यात भारतीय बाजारात आपला लेटेस्ट Xiaomi 14 Civi स्मार्टफोन सादर केला होता. तसेच, आता या फोनला नवीन अवतारामध्ये ब्रँडने Xiaomi 14 Civi Panda Limited Edition मध्ये लाँच केले आहे. यात प्रीमियम वेगन लेदर फिनिशसह विशेष ड्युअल-टोन डिझाईन देण्यात आली आहे. चला, पुढे नवीन डिव्हाईसची किंमत, ऑफर, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशन बाबत सविस्तर जाणून घेऊया.
शाओमी 14 सीवी पांडा लिमिटेड एडिशनची किंमत आणि उपलब्धता
- Xiaomi 14 Civi Panda Limited Edition स्मार्टफोन 12GB रॅम +512GB सिंगल स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच झाला आहे. ज्याची किंमत 48,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
- लाँच ऑफर अंतर्गत युजर्स ICICI क्रेडिट कार्ड, क्रेडिट आणि डेबिट कार्ड EMI ट्रँजॅक्शनवर 3,000 रुपयांचा इंस्टट डिस्काऊंट किंवा 3,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसचा लाभ घेऊ शकता.
- ऑफरनंतर Xiaomi 14 Civi Panda Edition ची किंमत 45,999 रुपये होईल.
- डिव्हाईसची सेल सोमवारी 29 जुलैला दुपारी 2 वाजता Flipkart, mi.com आणि Xiaomi रिटेल स्टोरवर सुरु झाली आहे.
शाओमी 14 सीवी पांडा लिमिटेड एडिशनमध्ये काय आहे वेगळे
Xiaomi CIVI 14 Panda Edition मध्ये ड्युअल-टोन कलरसह वेगन लेदर आणि मिरर ग्लास फिनिश दिले आहे. ही पांडा डिझाईन थीमने प्रेरित आहे. डिव्हाईसला भारतात अॅक्वा ब्लू, पांडा व्हाईट आणि हॉट पिंक सारख्या तीन रंगामध्ये आणले गेले आहे. सर्व व्हेरिएंटमध्ये ब्लॅक कलरची ग्लास आहे ज्याच्या मदतीने बॅक पॅनलवर प्रीमियम दोन कंट्रास्ट कलर पाहायला मिळतात. तर फोनच्या स्पेक्समध्ये कोणतीही बदल नाही.
शाओमी 14 सीवी पांडा लिमिटेड एडिशनचे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: शाओमी 14 सीवी पांडा लिमिटेड एडिशन स्मार्टफोनमध्ये 6.55 इंचाचा 1.5K कर्व्ड अॅमोलेड डिस्प्ले आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 446ppi पिक्सल डेंसिटी आणि 3,000 निट्स पीक ब्राईटनेस देण्यात आले आहे. तसेच स्क्रीनवर HDR10+ आणि डॉल्बी व्हिजन काला सपोर्ट पण आहे. तसेच, सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास विक्टस 2 लावले आहे.
- चिपसेट: Xiaomi 14 Civi Panda Limited Edition मोबाईलमध्ये युजर्सना 4 नॅनोमीटरवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 चिपसेटची पावर मिळते. यात T1 सिग्नल एन्हांसमेंट चिप पण आहे. स्मार्टफोनला आईसलूप कूलिंग सिस्टम ठंडा ठेवते.
- स्टोरेज आणि रॅम: स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.0 इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.
- कॅमेरा: स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात Leica ब्रँडिंग, OIS सपोर्ट, f/1.63 अपर्चर आणि 25mm फोकल लेंथ असलेला 50MP लाईट फ्यूजन 800 फोटो प्रायमरी सेन्सर, 2x झूम सह 50 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स आणि 120-डिग्री फिल्ड ऑफ व्यू असलेला 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा लावला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ड्युअल 32MP ची फ्रंट लेन्स आहे.
- बॅटरी: Xiaomi 14 Civi Panda Limited Edition मध्ये 4,700mAh ची बॅटरी आहे तर याला चार्ज करण्यासाठी 67W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
