Home बातम्या 5 कॅमेरे असलेला Xiaomi 14 CIVI ची विक्री सुरू होईल आजपासून, जाणून घ्या किंमत, डिस्काऊंट आणि ऑफर

5 कॅमेरे असलेला Xiaomi 14 CIVI ची विक्री सुरू होईल आजपासून, जाणून घ्या किंमत, डिस्काऊंट आणि ऑफर

Leica लेन्स ने सुसज्ज Xiaomi 14 CV आज 20 जूनपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. अलीकडेच हा फोन लाँच झाल्यापासून तंत्रज्ञान प्रेमी या मोबाईलची विक्री सुरू होण्याची वाट पाहत होते. शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स आणि प्रगत फिचर्सने सुसज्ज असलेल्या Xiaomi 14 CIVI ची किंमत, त्यावर उपलब्ध असलेल्या ऑफर्स आणि विक्रीचा तपशील तसेच त्याचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दलची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Xiaomi 14 CIVI ची किंमत आणि ऑफर्स

किंमत

Xiaomi 14 CV स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. त्याच्या 8 जीबी + 256 जीबी मॉडेलची किंमत 42,999 रुपये आहे आणि मोबाईलच्या 12 जीबी + 512 जीबी व्हेरिएंटची किंमत 47,999 रुपये आहे. हा फोन क्रूझ ब्लू (Cruise Blue), लेदर एडिशन मॅचा ग्रीन (Matcha Green) आणि मॅट फिनिश शॅडो ब्लॅक (Shadow Black) कलरमध्ये खरेदी करता येईल.

ऑफर्स

Xiaomi 14 CIVI कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच ई-कॉमर्स साईट Flipkart वर विकला जाईल. mi.in वरून खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा आणि Flipkart वरून खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Xiaomi 14 CIVI चे स्पेसिफिकेशन्स

आकर्षक डिस्प्ले

हा Xiaomi स्मार्टफोन 1236 x 2750 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.55 इंच फुलएचडी + 1.5K डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही एक Quad-Curve स्क्रीन आहे जी AMOLED पॅनेलवर बनलेली आहे आणि 120Hz रिफ्रेश रेट आणि 3000nits ब्राईटनेसवर काम करते. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास Victus 2 चे संरक्षण देखील मिळते आणि Dolby Vision atmos आणि HDR10+ चा सपोर्ट पण देण्यात आला आहे.

शक्तिशाली प्रोससिंग

Xiaomi 14 CV हा अँड्रॉइड 14 वर लाँच करण्यात आला आहे जो हायपर ओएस वर चालतो. प्रोसेसिंगसाठी यात Qualcomm चा Snapdragon 8s Gen 3 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार केलेला मोबाईल चिपसेट आहे, जो 3.0गीगाहर्ट्झ पर्यंत क्लॉक स्पीडने रन करण्यास सक्षम आहे. या 8-कोर Kryo CPU मध्ये एक 3.0GHz कॉर्टेक्स-X4 कोर, चार 2.8GHz Cortex-A720 कोर आणि तीन 2.0GHz Cortex-A520 कोर समाविष्ट आहेत.

मजबूत रॅम पॉवर

Xiaomi 14 CV भारतात दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या बेस मॉडेलमध्ये 8 जीबी रॅम देण्यात आली आहे, जी 256 जीबी स्टोरेजसह काम करते. तर दुसरा व्हेरिएंट 12 जीबी रॅमसह 512 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन LPDDR5X RAM + UFS 4.0 storage तंत्रज्ञानावर काम करतो.

आश्चर्यकारक कॅमेरा

Xiaomi 14 Civi Leica लेन्सचा ट्रिपल रिअर कॅमेरा सपोर्ट करतो. यात 25mm cinematic HDR असलेली 50MP Summilux लेन्स देण्यात आली आहे. ज्यामध्ये 2X झूम क्षमता असलेली 50MP 50mm Portrait Telephoto आणि 15एमए आणि 120 डिग्री एफओव्ही असलेली 12MP अल्ट्रा-वाईड लेन्स उपलब्ध आहे.

Xiaomi 14 CV स्मार्टफोनच्या फ्रंट पॅनलवर 32MP + 32MP ड्युअल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फ्रंट कॅमेरा सेटअप AI स्मार्ट तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. ज्यामध्ये Teleprompter, 4K Ultra HD, Focus Switching, Pocket Mirror आणि Dual Video mode सारखी उपयुक्त फिचर्स मिळतील.

मोठी बॅटरी

Xiaomi 14 CV स्मार्टफोन 4700 mAh बॅटरीला सपोर्ट करतो. कंपनीच्या दाव्यानुसार या बॅटरीमध्ये 1600 चार्ज सायकलची क्षमता आहे. म्हणजेच अनेक वेळा पूर्ण चार्ज केल्यानंतरही या बॅटरीची हेल्थ अबाधित राहील. ही मोठी बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी Xiaomi 14 Civi हा 67W Turbo Charge तंत्रज्ञानाला सपोर्ट करेल.