Home बातम्या Xiaomi पण बनवत आहे 64-मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन, जाईल का Samsung च्या पण पुढे?

Xiaomi पण बनवत आहे 64-मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन, जाईल का Samsung च्या पण पुढे?

Samsung ने गेल्याच महिन्यात टेक मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत ISOCELL Bright GW1 सेंसर टेक्नॉलॉजी सादर केली होती. हा कॅमेरा सेंसर आता लॉन्च झालेल्या सर्व मोबाईल कॅमेरा सेंसर्स मध्ये सर्वाधिक एडवांस आहे. या सेंसरची खासियत अशी कि याद्वारे 64-मेगापिक्सलचे फोटो क्लिक केले जाऊ शकतात. काही दिवसांपूर्वी माहिती आली होती कि Samsung आपल्या गॅलेक्सी सीरीजच्या Galaxy A70S स्मार्टफोन वर काम करत आहे जो 64-एमपी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. तसेच या लिस्ट मध्ये आता Xiaomi चे नाव पण आले आहे. बातमी अशी आहे कि Xiaomi पण 64-मेगापिक्सल वाल्या फोन वर काम करत आहे.

Xiaomi संबंधित हि बातमी चीनी बेंचमार्किंग साइट वेईबो वर देण्यात आली आहे. आइस यूनिवर्स ने वेईबो वर पोस्ट करत दावा केला आहे कि चीनी कंपनी शाओमी एका अशा स्मार्टफोन वर काम करत आहे जो 64-मेगापिक्सलच्या कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. या पोस्ट मध्ये फोनच्या नावाचा किंवा याच्या लॉन्च संबंधित कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही पण बातमीचा खुलासा झाल्यानंतर असे स्पस्ट झाले आहे कि Xiaomi चा हा आगामी स्मार्टफोन पण Samsung च्या ISOCELL Bright GW1 सेंसरला सपोर्ट करेल. आता जगातील पहिल्या 64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेल्या फोनच्या रेस मध्ये कोण पुढे जाते ते बघावे लागेल, Xiaomi कि Samsung

विशेषसा म्हणजे Samsung ने अलीकडेच ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजी दाखवली होती. या टेक्नॉलॉजी सह कोणताही स्मार्टफोन 64-मेगापिक्सल पर्यंतचे फोटो कॅप्चर करू शकतो. विशेष म्हणजे हे रेज्ल्यूशन आता पर्यंत जगात लॉन्च झालेल्या कोणत्याही स्मार्टफोन पेक्षा खूप जास्त आहे.

64-एमपी कॅमेरा असे करेल काम

सॅमसंग द्वारा सादर करण्यात आलेली नवीन ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजी pixel-merging Tetracell technology आणि remosaic algorithm च्या समन्वयाने बनली आहे. या दोन एडवांस टेकनॉलॉजी एकत्रित करून सॅमसंगचा हा कॅमेरा सेंसर लो लाईट मध्ये 16-मेगापिक्सलचे फोटो क्लिक करतो. हा सेंसर 16-मेगापिक्सल वर एक साथ 4 फोटो कॅप्चर करतो आणि चार वेगवेगळ्या फोटो फाइल्सला मिळून 64-मेगापिक्सलची एक फोटो फाईल बनवतो.

सोबतच ISOCELL Bright GW1 कॅमेरा सेंसर 100-डेसीबल (dB) पर्यंतच्या रियल टाईम हाई डायनामाइक रेंज (HDR) ला पण सपोर्ट करतो. त्यामुळे फोन मधून घेतलेला फोटो खूप उच्च श्रेृणीचा ह्यू देतो आणि कॅप्चर केलेल्या फोटो मधील सर्व रंग स्पष्ट आणि शार्प दिसतात. Samsung ची हि कॅमेरा सेंसर टेक्नॉलॉजी डुअल कन्वर्शन गेन (DCG) सहा येते जी कॅमेरा मध्ये येणार प्रकाश इलेक्ट्रोनिक सिग्नल मध्ये बदलते.

असे असतील खास फीचर्स

सॅमसंगचा हा कॅमेरा सेंसर इलेक्ट्रोनिक सिग्नल मध्ये बदलून हा प्रकाश फुल वॅल कॅपॅसिटी (FWC) द्वारे ऑप्टिमाइज करून फोटो संतुलतीपणे ब्राइट करतो. या कॅमेरा सेंसर टेक्नॉलॉजी मुळेच Xiaomi किंवा Samsung चा आगामी स्मार्टफोन 480fps स्पीड वर फुल एचडी स्लो-मोशन वीडियो घेऊ शकेल. सोबतच स्मार्टफोन हाई परफॉर्मेंस फेज डिटेक्शन आटो फोकस टेक्नॉलॉजी (Super PD) सारख्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सह येईल.