Home बातम्या Xiaomi घेऊन येत आहे ‘ब्लॅक फ्रायडे सेल’, स्मार्टफोन वर मिळेल दमदार डिस्काउंट

Xiaomi घेऊन येत आहे ‘ब्लॅक फ्रायडे सेल’, स्मार्टफोन वर मिळेल दमदार डिस्काउंट

Xiaomi ने आपल्या Mi Super Sale ची सुरवात केली आहे जो 28 नोव्हेंबर पर्यंत सुरु राहील. या सेल मध्ये शाओमी अनेक सेगमेंटमधील स्मार्टफोन काही काळासाठी स्वस्तात विकले जात आहेत. तसेच कंपनी हा सेल संपल्यावर आपला ब्लॅक फ्रायडे सेल सुरु करेल. तीन दिवस चालणार हा सेल 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत चालेल. शाओमीचा हा सेल मी.कॉम, फ्लिपकार्ट आणि अमेझॉन इंडिया वर आयोजित केला जाईल. कंपनीने सेलच्या तारखेची घोषणा केली आहे, पण डील्स बद्दल कोणतीही माहिती अजून समोर आली नाही.

ब्लॅक फ्रायडे सेल मध्ये कंपनी आपल्या स्मार्टफोन्स वर शानदार डिस्काउंट देईल. डिस्काउंट व्यतिरिक्त स्मार्टफोन्स वर खास डील्स पण मिळतील. समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी या सेल मध्ये आपल्या एखाद्या खास प्रॉडक्टची घोषणा पण करू शकते.

हे देखील वाचा: 10 डिसेंबरला लॉन्च होईल डुअल पंच-होल डिस्प्ले असलेला Xiaomi चा 5G फोन Redmi K30

दुसरीकडे कंपनीच्या वेबसाइट वर चालू असलेला Redmi Super Sale 28 नोव्हेंबर पर्यंत चालू राहील. या सेल मध्ये शाओमीने आपल्या रेडमी 7ए हँडसेट वर 1,200 रुपयांपर्यंतची सूट देत आहे. तर Redmi 7A चा 2 जीबी + 16 जीबी वेरिएंट 5,499 रुपये आणि 2 जीबी + 32 जीबी वेरिएंट 5,799 रुपयांमध्ये विकला जात आहे.

इतकेच नव्हे तर Redmi K20 Pro वर 3,000 रुपयांची सूट मिळत आहे. शाओमीच्या वेबसाइट वर रेडमी के20 प्रो चा 6 जीबी आणि 128 जीबी वेरिएंट 25,999 रुपये आणि 8 जीबी + 256 जीबी वेरिएंट 28,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

हे देखील वाचा: Xiaomi चा धमाका, फक्त 1 महिन्यात विकले 10 लाख Redmi Note 8 आणि Note 8 Pro स्मार्टफोन

विशेष म्हणजे शाओमीने काही दिवसांपूर्वी Mi Note 10 चा टीजर पण लॉन्च केला आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी हा फोन भारतात लवकरच लॉन्च करेल. भारतात या फोनचा ग्लोबल वेरियंट गूगल प्ले सपॉर्ट सह लॉन्च केला जाईल. तर इंडियन मार्केट मध्ये या फोनची टक्कर OnePlus 7T आणि Realme X2 Pro शी होईल.