Home बातम्या गेमिंग लवर्स साठी आला Black Shark 2, या किंमतीत मिळतील हे खास फीचर्स

गेमिंग लवर्स साठी आला Black Shark 2, या किंमतीत मिळतील हे खास फीचर्स

मोबाईल गेमिंग लवर्स साठी आज Xiaomi ने Black Shark 2 लॉन्च केला आहे. शाओमी फंडेड ब्लॅक शार्क कंपनीचा हा स्मार्टफोन गेमिंग व्यतिरिक्त चांगल्या कॅमेरा फीचर्स सह येतो. हा स्मार्टफोन चाइनीज मार्केट मध्ये मार्च मध्ये लॉन्च केला गेला आहे.

मोबाईल गेमिंगचा भारतात वाढत असलेला ट्रेंड बघून इंडियन मार्केट मध्ये हा फोन आला आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर आणि 12 जीबी रॅम सह येतो. डिवाइस मध्ये गेमिंग साठी खास टेक्नोलॉजीचा वापर केला गेला आहे. हँडसेट मध्ये टच मल्टीप्लेयर लिक्विड कूलिंग पण देण्यात आली आहे, ज्यामुळे डिवाइस दीर्घकाळ हेवी गेम्सनी गरम होत नाही.

किंमत आणि उपलब्धता
भारतीय मार्केट मध्ये Black Shark 2 ची किंमत (6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंट) 39,999 रुपयांपासून सुरु होत आहे. तासेच फोनच्या 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे. हा डिवाइस शॅडो ब्लॅक आणि फ्रोजन सिल्वर कलर ऑप्शंस मध्ये मिळेल. फोन फ्लिपकार्ट वर 4 जूनला सेल साठी येईल.

स्पेसिफिकेशन्स
Black Shark 2 मेटेलिक बॉडी वर बनला आहे. स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.39-इंचाच्या ट्रू व्यू ऐमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई सोबत या फोन मध्ये क्वालकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 आहे. तसेच गेमिंग एक्सपीरिएंस चांगला करण्यासाठी या फोन मध्ये एड्रेनो 640 जीपीयू चिप देण्यात आली आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Black Shark 2 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 13-मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 20-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 27वॉट चार्जला सपॉर्ट करते.