गेल्या अनेक दिवसांपासून Xiaomi च्या नवीन फोनची चर्चा चालू होती. बातमी अशी होती कि कंपनी लवकरच 108 MP कॅमेरा असलेला फोन लॉन्च करू शकते. सुरवातीला या फोनचे नाव नव्हते आले पण अलीकडेच कंपनीने स्वतःहून सांगितले आहे कि हा फोन Xiaomi CC9 Pro नावाने लॉन्च केला जाईल. यात 108 MP कॅमेऱ्यासह सादर केला जाईल. या फोन बद्दल लीक तर खूप आधीपासून येत होते पण आता पर्यंत स्पेसिफिकेशनची माहिती नव्हती. आज चीनी स्पेसिफिकेशन साइट टेना वर फोन संबंधित सर्व माहिती उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर फोनचे फोटो पण आले आहेत ज्यावरून तुम्ही डिजाइन बघू शकता. हा फोन पण कंपनीने पंच होल डिस्प्ले सह सादर केला आहे.
Xiaomi CC9 Pro चे स्पेसिफिकेशन
स्पेसिफिकेशन पाहता टेना वर देण्यात आलेल्या माहिती नुसार Xiaomi CC9 Pro मध्ये तुम्हाला 6.47 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले मिळेल. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन 2340×1080 पिक्सल आहे. फोनचे डायमेंशन 57.8×74.2×9.67 एमएम आहे आणि वजन 208 ग्राम. पण अजूनही स्क्रीन प्रोटेक्शनची माहिती नाही. स्क्रीन वर तुम्हाला वॉटरड्रॉप नॉच असलेला फ्रंट कॅमेरा मिळेल. तसेच फोनचा फोटो पाहून आम्हाला पण आश्चर्य वाटले ककारण यात खाली जाड बेजल देण्यात आला आहे. मागचा पॅनल ग्लासचा आहे आणि तीन कॅमेरा एकत्र आहेत. तर एक कॅमेरा थोडा खाली आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनर नाही. त्यामुळे असे वाटत आहे कि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असेल.
हे देखील वाचा: एका महिन्यात 120 लाख प्रोडक्ट्स विकून Xiaomi ने केला रेकॉर्ड, 85 लाख स्मार्टफोन्स सह विकले गेले 6 लाख MI TV
हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालेल. त्याचबरोबर फोन मध्ये 2.2 गीगाहट्र्ज ऑक्टाकोर प्रोसेसर मिळेल. राहिला प्रश्न रॅमचा तर हा 6 जीबी, 8 जीबी आणि 12 जीबी रॅम सह लिस्ट केला गेला आहे. तर स्टोरेज साठी 64 जीबी, 128जीबी आणि 256 जीबी चे ऑप्शन मिळतील. तसेच इथे स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे कि यात एक्सपांडेबल स्टोरेज असणार नाही पण कदाचित लॉन्च झाल्यावर येईल.
Xiaomi CC9 Pro चा कॅमेरा
डिजाइन पाहून तुम्ही अंदाज लावू शकता कि याच्या रियर पॅनल मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे. आम्ही आधीच सांगितले आहे कि यात एक सेंसर 108 मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा आणि तिसरा सेंसर 8 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. पण चोथ्या सेंसरबद्दल माहिती देण्यात आली नाही आशा आहे कि हा टीओएफ असेल. सेल्फी कडे वळूया, यात तुम्हाला 32 एमपी चा कॅमेरा मिळेल. अपर्चर साइजची माहिती अजून समजली नाही. एवढे मात्र समजले आहे कि यात 5 एक्स ऑप्टिकल झूम सपोर्ट आहे. तसेच साइड पॅनल वर तुम्हाला खास कॅमेरा बटण मिळेल. खूप दिवसांनी एखाद्या फोन मध्ये डेडिकेटेड कॅमेरा बटण मिळेल.
Xiaomi CC9 Pro ची बॅटरी आणि पोर्ट्स
देण्यात आलेल्या माहितीनुसार या फोन मध्ये तुम्हाला 5,170 एमएएच ची बॅटरी मिळू शकते. फास्ट चार्जिंग बद्दल माहिती तर नाही पण आशा आहे कि कमीत कमी 27 वॉट चा चार्जर असेल. तसेच यात डुअल सिम सपोर्ट आहे आणि यूएसबी टाईप सी मिळेल.
हे देखील वाचा: फक्त 12,490 रुपयांमध्ये लॉन्च झाला LG W30 Pro, 4050एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह आहे ट्रिपल रियर कॅमेरा
Xiaomi CC9 Pro 5 नोव्हेंबरला चीन मध्ये लॉन्च होईल. राहिला प्रश्न किंमतीचा तर हा 2,500 युआन अर्थात 25,000 रुपयांच्या आसपास लॉन्च केला जाऊ शकतो. भारतात शाओमी सीसी सीरीज लॉन्च होत नाही त्यामुळे आपण काही बोलू शकत नाही पण बातमी अशी आहे कि हा फोन पोको एफ2 नावाने लॉन्च होऊ शकतो.
