Home बातम्या इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये टॉपला शाओमी, रियलमी पण करत आहे शानदार वाढ

इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये टॉपला शाओमी, रियलमी पण करत आहे शानदार वाढ

भारतीय स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपला दबदबा कायम ठेवला आहे. एक रिसर्च फर्म Canalys च्या रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि साल 2019 मध्ये शाओमी 29 टक्के हिस्सेदारी पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे. रिपोर्टनुसार साल 2019 च्या चौथ्या तिमाहीत इंडियन मार्केट 14 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्यावर्षीच्या चौथ्या तिमाहीत 3.9 कोटी स्मार्टफोन्सची शिपमेंट झाली आहे. 2018 च्या चौथ्या तिमाही बद्दल बोलायचे झाले तर तेव्हा स्मार्टफोन्सची शिपमेंट 3.41 कोटी यूनिट होती. इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये शाओमी 1.12 कोटी यूनिट्स शिपमेंट सह टॉपला आहे.

शाओमी व्यतिरिक्त साल 2019 मध्ये चौथ्या क्वार्टर मध्ये सॅमसंग 21 टक्के बाजारात हिस्सेदारी सह दुसऱ्या स्थानावर राहिली आहे. तसेच सॅमसंगने 2019 च्या चौथ्या तिमाहीत 81 लाख स्मार्टफोन्सची शिपमेंट केली आहे. तसेच Vivo 18 टक्के मार्केट शेयर सह तिसऱ्या नंबर वर आहे. वीवो ने साल 2019 च्या चौथ्या तिमाहीत 70 लाख स्मार्टफोन्सची शिपमेंट केली. तसेच शाओमीच्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी रियलमीची कामगिरी पण शानदार आहे. Realme बद्दल बोलायचे तर 2019 च्या चौथ्या तिमाहीत Realme ची बाजारातील हिस्सेदारी 12 टक्के आहे.

रियलमी ने याकाळात 47 लाख स्मार्टफोन्सची शिपमेंट केली आहे. साल 2018 च्या चौथ्या तिमाहीत Realme ची बाजारात हिस्सेदारी फक्त 4 टक्के होती आणि कंपनीने फक्त 13 लाख स्मार्टफोन्सची शिपमेंट केली होती. 2019 च्या चौथ्या तिमाहीत Realme चौथ्या क्रमवार राहिली आहे. चौथ्या तिमाहीत शाओमी, सॅमसंग, वीवो आणि रियलमी व्यतिरिक्त Oppo चा मार्केट शेयर पण 12 टक्के आहे. Oppo ने गेल्यावर्षी की चौथ्या तिमाहीत 45 लाख स्मार्टफोन्सची शिपमेंट केली आहे. रिपोर्टमध्ये समोर आले आहे कि 2013 च्या चौथ्या तिमाही नंतर हा ऍप्पलचा सर्वात चांगला क्रमांक आला आहे. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि ऍप्पलने 2019 च्या चौथ्या तिमाहीत जवळपास 9,25,000 iPhone ची शिपमेंट केली आहे.