Home बातम्या शाओमी ने लॉन्च केले दोन फीचर फोन, जियोफोनला मिळू शकते स्पर्धा

शाओमी ने लॉन्च केले दोन फीचर फोन, जियोफोनला मिळू शकते स्पर्धा

चीन ची अॅप्पल म्हणून ओळखली जाणारी शाओमी सध्या भारतीय स्मार्टफोन बाजारातील सर्वात मोठा ब्रँड आहे. बजेट स्मार्टफोन ते फ्लॅगशिप फोन पर्यंत शाओमी सतत टेक विश्वाला नवीन टेक्नोलॉजी आणि शानदार डिवाईस देत आहे. शाओमी स्मार्टफोन सोबत अनेक स्मार्ट गॅजेट्स पण बनवत आहे. शाओमी ने आता मोबाईल जगात नवीन चाल खेळली आहे. स्मार्टफोन बाजारावर अधिराज्य गाजवणारी कंपनी आता फीचर फोन घेऊन आली आहे. शाओमी फीचर फोन अंर्तराष्ट्रीय बाजारात आला आहे.

शाओमी ने फीचर फोन बाजारात पाऊल टाकत एक साथ 2 नवीन मोबाईल सादर केले आहेत. कंपनी ने ‘चिन सीरीज’ ची सुरवात केली आहे. या फीचर फोन सीरीज मध्ये शाओमी ने ‘चिन 1’ आणि ‘चिन 1एस’ नावाने दोन फीचर फोन आणले आहेत. हे दोन्ही मोबाईल फोन लुक आणि डिजाईन मध्ये एक सारखे आहेत. यात 240 x 320 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 2.8-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन चे बॉडी डायमेंशन 132 x 53.8 x 8.5 एमएम चे आहे ज्यात कीपॅड पण आहे. या दोन्ही फीचर फोन मध्ये माइक्रो सिम साठी डुअल स्लॉट देण्यात आला आहे.

शाओमी च्या या दोन्ही फोन मध्ये सर्वात मोठा फरक नेटवर्क कनेक्टिविटी चा आहे. शाओमी चिन1 2जी नेटवर्क ला सपोर्ट करतो तर शाओमी चिन 1एस 4जी कनेक्टिविटी सपोर्ट सह येतो. चिन 1 मध्ये जीपीएस आणि एलटीई नाही तसेच हा वाईफाई व ब्लूटूथ 4.2 आॅप्शन सह ‘नूक्लीअस’ ओएस वर चालतो. तर शाओमी चिन 1एस वाईफाई व ब्लूटूथ सह जीपीएस, वोएलटीई ला पण सपोर्ट करतो.

स्पेसिफिकेशन्स पाहता शाओमी चिन 1 मध्ये 8एमबी रॅम देण्यात आला आहे तसेच फोन मध्ये 16एमबी इंटरनल स्टोरेज आहे. तर शाओमी चिन 1एस मध्ये 256एमबी रॅम आणि 512एमबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. चिन 1 एआरएम7 सीपीयू सह मीडियाटेक एमटी6260ए चिपसेट वर चालतो तर चिन 1एस मध्ये 1.2गीगाहर्ट्ज़ कोर्टेक्स ए53 प्रोसेसर सह स्प्रॅडट्रम एससी9820 चिपसेट आहे.

शाओमी चे हे दोन्ही स्मार्टफोन खुप स्लीम आणि आर्कषक आहेत. फोन मध्ये टी9 बटन देण्यात आले आहेत. शाओमी चिन 1 आणि शाओमी चिन 1एस च्या खालच्या पॅनल वर स्पीकर ग्रिल आहे. दोन्ही फोन मध्ये एआई क्षमता आहे. मनोरंजनासाठी यात 4जी रेडियो देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हे फोन 1,480एमएएच च्या बॅटरी ला सपोर्ट करतात.

आश्चर्यकारक बाब म्हणजे शाओमी चिन 1 आणि चिन 1एस दोन्ही फोन मॉडेल मध्ये कॅमेरा देण्यात आला नाही. फोनच्या बॅक किंवा फ्रंट दोन्ही पॅनल वर कोणताही कॅमेरा सेंसर नाही. त्याचबरोबर शाओमी च्या या फोन मध्ये 3.5एमएम आॅडियो जॅक पण नसेल. म्हणजे रेडियो फक्त स्पीकर वरून ऐकवा लागेल.

शाओमी ने आपले हे फीचर फोन क्राउड फंडिग च्या माध्यमातून बनवले आहेत. फोनची निर्मिती शाओमी ने शेंनझेन डुओजिआ टेक्नोलॉजी सोबत मिळून केली आहे. रिपोर्ट्स नुसार शाओमी ने टारगेट ठेवले होते की जर कंपनी ला 1,000 रजिस्ट्रेशन मिळाले तर कंपनी या फीचर फोन ची निर्मिती करेल. आणि रजिस्ट्रेशन सुरू होताच 7,237 लोकांनी हा फोन प्रीबुक केला.

किंमत पाहता शाओमी ने आपला हा मोबाईल फोन 199 युआन मध्ये लॉन्च केला आहे, जी भारतीय करंसी नुसार जवळपास 1,999 रुपये आहे. हा फोन चीनी बाजारात 15 सप्टेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल. शाओमी हा नवीन फीचर फोन भारतात लॉन्च करेल अशी कोणतीही शक्यता सध्या दिसत नाही. पण जर शाओमी चिन 1 आणि चिन 1एस भारतात आले तर जियोफोन आणि जियोफोन 2 सोबत यांची टक्कर होऊ शकते. तसेच जियोफोन ने बनवलेल्या अंर्तराष्ट्रीय रेकॉर्ड ला आता शाओमी चे फीचर फोन धक्का देऊ शकतात.