Home बातम्या Xiaomi करणार आहे धमाका, 5 पॉप-अप कॅमेऱ्यासह लवकरच येऊ शकतो फोल्डेबल फोन

Xiaomi करणार आहे धमाका, 5 पॉप-अप कॅमेऱ्यासह लवकरच येऊ शकतो फोल्डेबल फोन

यावर्षी सॅमसंग Galaxy Fold पासून हुवावे Mate X पर्यंत काही फोल्डेबल फोन्सने मार्केट आले आहेत. तसेच गॅलेक्सी फोल्ड नुकताच भारतात आला आहे. तसेच शाओमीने पण फोल्डेबल फोन साठी तयारी सुरु केली आहे. Xiaomi ने काही दिवसांपूर्वी प्रोटोटाइप फोल्डेबल फोनचा एक विडियो जारी केला होता. आता या फोन संबंधित अजून माहिती समोर आली आहे.

शाओमीचा हा अपकमिंग फोल्डेबल फोन मार्केट मधील सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड आणि हुवावे मेट एक्सला चांगलेच आव्हान देऊ शकतो. शाओमीचा फोल्डेबल फोनचा पेटेंट पाहता त्यानुसार फोन मध्ये पेंटा पॉप-अप कॅमेरा सेटअप दिला जाईल.

पेटेंट मध्ये पॉप-अप कॅमेऱ्यात पाच सेंसर्स दिसले आहेत. डिजाइन वरून अंदाज लावला जात आहे कि हा कॅमेरा सेटअप फ्रंट आणि रियर दोन्ही साठी उपयोगी पडेल. जर फोन अनफोल्ड केल्यास हा पॉप-अप कॅमेरा फोनच्या डाव्या बाजूला येतो. याच्या फाइनल डिजाइन मध्ये बदल पण केले जाऊ शकतात. याआधी समोर आलेल्या रिपोर्ट्स नुसार, शाओमीचा फोल्डेबल फोन 74,000 रुपयांच्या आसपास लॉन्च केला जाऊ शकतो.

कंपनीने लॉन्च डेट बद्दल कोणतीही अधिकृत घोषणा तर नाही केली, पण आगामी काही महिन्यात हा फोन लॉन्च होऊ शकतो. तसेच कंपनीने काही दिवसांपूर्वी आपला पाच रियर कॅमेरा असलेला Mi CC9 प्रो सादर केला होता. याला Mi Note 10 असे नाव देण्यात आले आहे.

अलीकडेच समोर आले होते कि शाओमी Redme K30 याचवर्षी म्हणजे डिसेंबरच्या आधी आणि Redmi K30 Pro पुढल्या वर्षी लॉन्च केला जाऊ शकतो. आधी समोर आलेल्या रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले होते कि Redmi K30 मध्ये यूजर्सना 5G सपॉर्ट मिळू शकतो. तसेच समोर आलेल्या माहिती नुसार या फोन मध्ये पंच होल डिस्प्ले व्यतिरिक्त MediaTek चिपसेट असू शकतो. तसेच कंपनीने काही दिवसांपूर्वी Redmi K30 ची पहिली झलक जारी केली होती. हा खुलासा स्वतः रेडमीचे जनरल मॅनेजर Lu Weibing यांनी केला होता.

बोलले जात आहे कि रेडमी के सीरीजचा हा आगामी स्मार्टफोन SA/NSA dual-mode 5G सपोर्टेड असेल. फोनच्या या फीचर मुळे 5G कनेक्टिविटी खूप मिळेल. विशेष म्हणजे क्वालकॉम ने नुकतेच आपल्या स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीजच्या चिपसेट मध्ये 5G सपोर्ट देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे असे बोलले जात आहे कि Redmi K30 क्वालकॉमच्या याच चिपसेट सह लॉन्च केला जाईल.

शाओमी मी सीसी9 प्रो वीडियो