Home बातम्या Xiaomi चा दावा आता 24 तासांत होईल फोन डिलीवर, नाही झाला तर पैसे परत

Xiaomi चा दावा आता 24 तासांत होईल फोन डिलीवर, नाही झाला तर पैसे परत

Xiaomi भारतातील सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड बनला आहे. कंपनी लो बजेट सेग्मेंट मध्ये जे स्मार्टफोन लॉन्च करते ते सर्व मार्केट मध्ये हिट होतात. Xiaomi स्मार्टफोन्सचे फ्लॅश सेल नेहमी आउट ऑफ स्टॉक होतात. गेल्या काही दिवसांपासून शाओमीने एकापाठोपाठ एक अनेक हिट स्मार्टफोन्स देशात ओपन सेल साठी उपलब्ध केले आहेत. तर आज आपल्या फॅन्सना कमीत कमी वेळात त्यांचा फोन देण्याच्या उद्देशाने Xiaomi ने ‘Guaranteed Next-Day delivery’ ची सुरवात केली आहे.

Xiaomi द्वारा भारतात ‘Guaranteed Next-Day delivery’ ची सुरवात केली गेली आहे. या खास सुविधेचा मुख्य उद्देश्य शाओमी स्मार्टफोन विकत घेणाऱ्या यूजर्सना कमीत कमी वेळात त्यांचा स्मार्टफोन उपलब्ध करवून देणे हा आहे. Guaranteed Next-Day delivery सर्विस अंतर्गत शाओमी एका दिवसांनंतरच स्मार्टफोन डिलीवर करण्याचा दावा करत आहे. या दाव्यासोबतच कंपनीने यूजर्सना असा शब्द दिला आहे कि एका दिवसात फोन डिलीवर न केल्यास डिलीवरी चार्ज फ्री केला जाईल.

Xiaomi ने आपल्या हि फास्ट डिलीवरी सर्विस देशातील 150 शहरांत सुरु केली आहे. कंपनी द्वारा Guaranteed Next-Day delivery सर्विस अंतर्गत 90 पेक्षा जास्त प्रोडक्ट्सचा समावेश केला आहे ज्यांची डिलीवरी प्रोडक्ट ऑर्डर केल्यांनतर पुढल्या दिवशी केली जाईल. या 150 शहरांची यादी कंपनीच्या वेबसाइट वर उपलब्ध करवण्यात आहे. गॅरंटीड नेक्स्ट डे डिलीवरी अंतर्गत त्याच तेच प्रोडक्ट्स वर फास्ट डिलीवरीचा लाभ मिळेल जे मी डॉट कॉम वरून विकत घेतले जातील.

या आहेत अटी
Xiaomi च्या Guaranteed Next-Day delivery सर्विसचा लाभ घेण्यासाठी यूजर्सना कंपनीच्या वेबसाइट वरून कोणताही प्रोडक्ट दुपारी 3 बवाजल्याच्याआधी ऑर्डर करावा लागेल. या सर्विस अंतर्गत विकत घेतल्या जाणाऱ्या डिवाईसेज वर डिलीवरी साठी 49 रुपयांचा अतिरिक्स डिलीवरी चार्ज द्यावा लागेल. या नेक्स्ट डे डिलीवरी अंतर्गत सोमवार ते शुक्रवार पर्यंतच ऑर्डर करता येतील. शनिवार व रविवारच्या दिवशी तसेच सरकारी सुट्टीच्या दिवशी Guaranteed Next-Day delivery लागू नसेल.

विशेष म्हणजे जर Guaranteed Next-Day delivery सर्विस अंतर्गत स्मार्टफोन विकत घेतल्यावर दुसऱ्या दिवशी निर्धारित वेळेत प्रोडक्ट डिलीवर न झाल्यास Xiaomi कडून 49 रुपयांचा डिलीवरी चार्ज फ्री केला जाईल. तसेच हि ऑफर एक्सचेंज ऑडर्स वर लागू असणार नाही.

जाता जाता सांगू इच्छितो कि Xiaomi ने घोषणा केली आहे कि कंपनी आपली के सीरीज लवकरच भारतात लॉन्च करेल. भारतात रेडमी के सीरीजचे दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोन Redmi K20 आणि Redmi K20 Pro घेऊन येणार आहे. जुलै महिन्यात Redmi K सीरीज इंडियन स्मार्टफोन बाजारात येईल.