Home बातम्या 31 मार्चला भारतात लॉन्च होईल 108एमपी कॅमेरा असलेला Xiaomi चा पावरफुल फोन Mi 10 5G

31 मार्चला भारतात लॉन्च होईल 108एमपी कॅमेरा असलेला Xiaomi चा पावरफुल फोन Mi 10 5G

Xiaomi ने कालच आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वर ट्वीट करून सांगितले होते कि कंपनी लवकरच भारतात आपल्या ‘मी सीरीज’ चा विस्तार करत नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल. काल शाओमीने असा खुलासा तर केला होता कि मी सीरीजचा हा आगामी स्मार्टफोन 108 मेगापिक्सल रियर कॅमेऱ्यासह येईल, पण कंपनीने फोनची लॉन्च डेट सांगितली नव्हती. परंतु आज आपल्या इंडियन फॅन्सना खुशखबर देत शाओमीने Mi 10 सीरीजच्या या नवीन फोनची लॉन्च डेट सांगितली आहे.

शाओमीने ट्वीट करून खुलासा केला आहे कि येत्या 31 मार्चला कंपनी भारतात आपला नवीन स्मार्टफोन Xiaomi Mi 10 लॉन्च करेल. कंपनी कोरोनामुळे कोणताही ईवेंट करणार नाही तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर लाईव स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा डिवाईस को भारतीय बाजारात आणेल. Xiaomi ने आपल्या ट्वीट मध्ये या आगामी फोनचे नाव Mi 10 5G असे सांगितले आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि हा भारतात येणारा शाओमीचा पुढील 5जी फोन असेल.

Xiaomi Mi 10 5G चा लॉन्च ईवेंट 31 मार्च दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल जो शाओमीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच फेसबुक, ट्वीटर व यूट्यूब सारख्या ब्रँडच्या सर्व सोशल प्लॅटफॉर्म वर लाईव बघता येईल. आशा आहे कि शाओमी मी 10 फोनच्या लॉन्च बद्दल ई-कॉमर्स साईट अमेझॉन इंडियाने पण ट्वीट केले होते. अमेझॉनच्या ट्वीट नंतर स्पष्ट झाले आहे कि Xiaomi Mi 10 भारतात या शॉपिंग साइट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. सीरीज अंतर्गत एकच फोन लॉन्च होईल कि दोन हे अजून निश्चित समजले नाही.

Xiaomi Mi 10 Pro

शाओमी मी10 प्रो सीरीजचा मोठा मॉडेल आहे. या फोन मध्ये पण 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 6.67 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. मी 10 प्रो पण कंपनीने कर्व्ड डिजाईन वर बनवला आहे आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीने सुसज्ज करून बाजारात आणला आहे. Xiaomi Mi 10 Pro पण एक 5G फोन आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर चालतो. कंपनीने हा डिवाईस एंडरॉयड 10 आधारित मीयूआई 11 वर लॉन्च केला आहे.

Xiaomi Mi 10 Pro च्या कॅमेरा सेग्मेंट बद्दल बोलायचे तर फोन मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 108 मेगापिक्सलचा ISOCELL Bright HMX सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत 20 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 12 मेगापिक्सलची शार्ट टेलीफोटो लेंस आणि 8 मेगापिक्सलची मोठी टेलीफोटो लेंस आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वरील पंच होल मध्ये 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा डिवाईस पावर बॅकअपसाठी 50वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीने सुसज्ज असलेल्या 4,500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Xiaomi Mi 10

शाओमी मी 10 बद्दल आधी बोलूया, हा स्मार्टफोन 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल कर्व्ड एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते तसेच शाओमीने फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च झाला आहे जो मीयूआई 11 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Xiaomi Mi 10 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा चिपसेट 5G कनेक्टिविटीला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Xiaomi Mi 10 च्या बॅक पॅनल वर चार रियर कॅमेरा सेंसर्स देण्यात आले आहेत ज्यात 108 मेगापिक्सलचा प्राइमरी ISOCELL Bright HMX सेंसरचा समावेश आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेंस आणि दोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसर्सला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. शाओमी मी10 30वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेल्या 4,780एमएएच च्या बॅटरी सह लॉन्च केला गेला आहे.