Xiaomi ने मागे घोषणा केली होती कि कंपनी येत्या 27 मार्चला ‘मी सीरीज’ चे दोन पावरफुल स्मार्टफोन Mi 10 आणि Mi 10 Pro ग्लोबली मंचावर लॉन्च करेल. आता बातमी मिळाली आहे कि या दिवशी ग्लोबल लॉन्च सोबतच हे दोन्ही डिवाईस भारतीय बाजारात पण येतील. शाओमी इंडिया आणि ब्रँडचे ग्लोबल वीपी मनु कुमार जैन यांनी पण आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलच्या माध्यमातून घोषणा केली आहे कि 108 मेगापिक्सल रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन लवकरच इंडियन मार्केट मध्ये येणार आहे.
शाओमी इंडियाने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलच्या माध्यमातून या लॉन्चची घोषणा केली आहे. कंपनीने Mi 10 आणि Mi 10 Pro च्या लॉन्च डेटची माहिती दिली नाही पण शाओमीने #108MP is here ट्वीटर वर ट्रेंड करायला सुरवात केली आहे. आशा आहे कि 27 मार्चला ग्लोबल लॉन्च सोबतच हे फोन भारतात पण अनाउंस केले जातील. हे स्मार्टफोन आधी 11 फेब्रुवारीला ग्लोबली लॉन्च केले जाणार होते पण कोरोना वायरसमुळे शाओमीला आपला ईवेंट रद्द करावा लागला होता.
? ???? ????
? ? ? ? ?
? ? ? ? ?
? ? ? ????
? #108MPIsHere #108MP
? ? ? ? ?
? ? ? ? ?
? ???? ????— Manu Kumar Jain (@manukumarjain) March 18, 2020
27 मार्चला पण Xiaomi कोणत्याही ईवेंटचे आयोजन करणार नाही तर ऑनलाईन स्ट्रीमिंगच्या माध्यमातून मी 10 सीरीजचे नवीन स्मार्टफोन्स ग्लोबली लॉन्च करेल. हा लाईव ईवेंट 27 मार्चला संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. विशेष म्हणजे शाओमी इंडियाचे हे ट्वीट ई—कॉमर्स साईट अमेझॉन इंडियाने पण शेयर केले आहे. अमेझॉनच्या ट्वीटनंतर स्पष्ट झाले आहे कि Mi 10 आणि Mi 10 Pro भारतात या शॉपिंग साइट वर विक्रीसाठी उपलब्ध होतील.
Xiaomi Mi 10
शाओमी मी 10 बद्दल आधी बोलूया, हा स्मार्टफोन 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल कर्व्ड एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते तसेच शाओमीने फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च झाला आहे जो मीयूआई 11 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Xiaomi Mi 10 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा चिपसेट 5G कनेक्टिविटीला सपोर्ट करतो.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Xiaomi Mi 10 च्या बॅक पॅनल वर चार रियर कॅमेरा सेंसर्स देण्यात आले आहेत ज्यात 108 मेगापिक्सलचा प्राइमरी ISOCELL Bright HMX सेंसरचा समावेश आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेंस आणि दोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसर्सला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. शाओमी मी10 30वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेल्या 4,780एमएएच च्या बॅटरी सह लॉन्च केला गेला आहे.
Xiaomi Mi 10 Pro
शाओमी मी10 प्रो सीरीजचा मोठा मॉडेल आहे. या फोन मध्ये पण 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 6.67 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. मी 10 प्रो पण कंपनीने कर्व्ड डिजाईन वर बनवला आहे आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीने सुसज्ज करून बाजारात आणला आहे. Xiaomi Mi 10 Pro पण एक 5G फोन आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर चालतो. कंपनीने हा डिवाईस एंडरॉयड 10 आधारित मीयूआई 11 वर लॉन्च केला आहे.
Xiaomi Mi 10 Pro च्या कॅमेरा सेग्मेंट बद्दल बोलायचे तर फोन मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 108 मेगापिक्सलचा ISOCELL Bright HMX सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत 20 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 12 मेगापिक्सलची शार्ट टेलीफोटो लेंस आणि 8 मेगापिक्सलची मोठी टेलीफोटो लेंस आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वरील पंच होल मध्ये 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा डिवाईस पावर बॅकअपसाठी 50वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीने सुसज्ज असलेल्या 4,500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.
