Xiaomi ने आपल्या 10वा वर्धापन दिन साजरी करण्यासाठी एक लॉन्च इवेंट आयोजित केला ज्यात Mi 10 सीरीजचा सर्वात प्रीमियम स्मार्टफोन मॉडेल लॉन्च केला गेला आहे. या स्मार्टफोनला Mi 10 Ultra नाव देण्यात आले आहे. Mi 10 Ultra चे मुख्य आकर्षण 120W फास्ट वायर्ड चार्जिंग आहे जी बॅटरीला फक्त 23 मिनिटांत चार्ज करते. तसेच हँडसेट मध्ये 50W वायरलेस चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले, अल्ट्रा-झूम सह क्वाड रियर कॅमेरा आहे.
डिजाइन
मी 10 अल्ट्रा मध्ये फ्रंटला टॉप-लेफ्ट कॉर्नर वर होल-पंच देण्यात आला आहे. या होल-पंच मुळे फोन मध्ये फ्रंटला बेजल्स खूप कमी आहेत. फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर ऑन-ऑफ बटन मिळेल. तसेच मागे क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यात एकाखाली एक कॅमेरे आहेत. यात सर्वात वर मुख्य पेरिस्कोप सेंसर देण्यात आला आहे, जो 120x झूम ऑफर करतो. या सेटअप मध्ये एलईडी लाइट पण मिळेल. या सेटअपच्या खाली मी ची ब्रॅंडिंग आहे.
Mi 10 Ultra चे स्पेसिफिकेशन्स
Mi 10 अल्ट्रा चे स्पेसिफिकेशंस पाहता हँडसेट मध्ये 6.67-इंचाचा फुल-एचडी + OLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि इन-डिस्प्ले डिस्प्ले स्कॅनर सह देण्यात आला आहे. तसेच हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 SoC वर चालतो. फोन मध्ये 16GB पर्यंतचा रॅम आणि 512GB UFS 3.1 पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. Xiaomi ने Mi 10 Ultra मध्ये गेम खेळताना फोन मध्ये इफेक्टिव टेंपरेचर मॅनेजमेंटसाठी वीसी लिक्विड कूलिंग, मल्टी-लेयर ग्रॅफाइट, थर्मल सेंसर अरे आणि ग्राफीन पण दिला आहे.
फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन मध्ये 48MP प्राइमरी सेंसर सह एक क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 108MP, 20MP वाइड-अँगल सेंसर, 12MP पोर्ट्रेट सेंसर आणि टेलीफोटो स्नॅपर आहे. तसेच यात 120x अल्ट्रा झूम देण्यात आला आहे. याव्यतिरीक्त फोन मध्ये लेजर ऑटो-फोकस, फ्लिकर सेंसर आणि 8K वर वीडियो शूट करण्याची क्षमता आहे. पुढच्या बाजूला सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 20MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.
Mi 10 Ultra एंडरॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम सह MIUI 12 वर चालतो. तसेच फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,500mAh ची बॅटरी आहे. वर सांगितल्याप्रमाणे फोन 120W फास्ट वायर्ड आणि 50W फास्ट वायरलेस चार्जिंग सपोर्ट सह येतो. फोन मध्ये 10W रिवर्स वायरलेस चार्जिंग, डुअल स्टीरियो स्पीकर, यूएसबी टाइप-सी आणि एनएफसी चा पण समावेश आहे.
Mi 10 Ultra ची किंमत आणि उपलब्धता
Mi 10 Ultra च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत चीन मध्ये RMB 5,299 (जवळपास 57,000 रुपये) आहे. तर 8GB RAM आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत RMB 5,599 (जवळपास 60,000 रुपये), 12GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत RMB 5,999 (जवळपास 64,400 रुपये) आणि टॉप-एन्ड 16GB रॅम + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत RMB 6,999 (जवळपास 75,200 रुपये) आहे.
हँडसेट दोन कलर ऑप्शन: Obsidian Black आणि Mercury Silver मध्ये येतो. याव्यतिरिक्त डिवाइसचा ट्रांसपरंट एडिशन पण आहे. इसके अलावा फोन चीन मध्ये 16 अगस्त से सेलसाठी आएगा. हालांकि, Mi 10 Ultra के इंडिया लॉन्च को लेकर कोई जानकारी समोर नहीं आई आहे. वहीं, कंपनी ने अलग से 55W वायरलैस चार्जिंग स्टैंड को पण लॉन्च किया आहे, जिसकी किंमत RMB 199 (जवळपास 2,100 रुपये) आहे.
