जवळपास चार महीने झाले शाओमी च्या फ्लॅगशिप स्मार्टफोन मी 7 च्या बाबतीत लागोपाठ बातम्या लीक्स समोर येत आहेत. दरम्यान शाओमी ने अनेक फोन अंर्तराष्ट्रीय बाजारात आणले पण मी 7 काही समोर आला नाही. पण आता असे वाटते आहे की लवकरच शाओमी फॅन्स ची प्रतीक्षा संपणार आहे. इंटरनेट वर एक पोस्ट वायरल झाली आहे ज्यात शाओमी मी 7 च्या लॉन्च ची माहिती दिली आहे. या पोस्ट नुसार मे महिन्याच्या 23 तारखेला शाओमी आपला हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस मी 7 टेक जगासमोर घेऊन येईल.
शाओमी मी 7 च्या लॉन्च ची ही माहिती चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर शेयर केली आहे. या पोस्ट मध्ये ही टीजर ईमेज दाखविण्यात आली आहे ज्यात शाओमी लोगो वाला एक फोटो आहे आणि या फोटो वर मोठा ‘7’ लिहीलेला आहे. या फोटो मध्ये 23 मे तारखेचा उल्लेख आहे. या इमेज वरून समजत आहे की शाओमी मी 7 23 मे ला अंर्तराष्ट्रीय मंचावर लॉन्च केला जाईल.
शाओमी कडून मी 7 च्या बाबतीत कोणतीही आॅफिशियल माहिती मिळाली नाही. कंपनी ने फोन लॉन्च ची कोणतीही सूचना दिली नाही आणि फोन चे स्पेसिफिकेशन्स पण सांगितले नाहीत. त्यामुळे 23 मे ला पण मी 7 लॉन्च होईल की नाही ते निश्चित नाही. पण टेक वर्ल्ड मध्ये चर्चा आहे की शाओमी मी 7 सोबत मी 7 प्लस पण कंपनी लॉन्च करू शकते.
तसेच शाओमी मी 7 बद्दल आता पर्यन्त आलेल्या लीक्स नुसार हा फोन पण अॅप्पल आयफोन 10 प्रमाणे बेजल लेस नॉच डिसप्ले सह येईल तसेच हा 6.01-इंचाच्या फुलएचडी+ डिसप्ले वर लॉन्च केला जाईल. फोन मध्ये 6जीबी ची रॅम व 64जीबी ची इंटरनल स्टोरेज असेल आणि हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह येईल.
फोन मध्ये 20-मेगापिक्सल + 12-मेगापिक्सल चा डुअल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो तसेच सेल्फी साठी यात 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळेल. तर पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी मिळू शकते. पण शाओमी मी 7 च्या स्पेसिफिकेशन्स साठी कंपनी च्या अधिकृत माहितीसाठी तसेच फोन लॉन्च ची वाट बघावी लागेल.
