Home बातम्या शाओमी मी8 एक्स ची माहिती झाली लीक, डुअल कॅमेरा सोबत असेल आॅन स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर

शाओमी मी8 एक्स ची माहिती झाली लीक, डुअल कॅमेरा सोबत असेल आॅन स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर

जून मध्ये शाओमी ने आपल्या मी 8 सीरीज मध्ये 3 मॉडेल सादर केले होते. कंपनी ने शाओमी मी 8, मी 8 एक्सपोज आणि मी 8एसई सादर केले होते. मी 8एसई या सीरीज मधील सर्वात स्वस्त फोन आहे आणि बोलले जात आहे की कंपनी हा भारतात सादर करू शकते. तसेच आज शाओमी च्या 8 सीरीज फोन बद्दल माहिती आली आहे. बातमी अशी आहे की कंपनी मी 8एक्स लॉन्च करणार आहे. या फोन चे लाइव फोटो समोर आले आहेत.

चीनी सोशल नेटवर्किंग साइट बेइबो वर फोन चे काही फोटो शेयर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर शाओमी मी 8एक्स बद्दल खास माहिती पण आली आहे. फोटो मध्ये शाओमी मी 8एक्स चा मागचा पॅनल दिसत आहे जो ग्लास फिनश मध्ये आहे. फोन ची बॉडी कर्व्ड आहे आणि मागच्या पॅनल वर डुअल कमेरा स्पष्ट दिसत आहे. फोन मध्ये डुअल कॅमेरा वर्टिकल स्टाइल मध्ये देण्यात आला आहे. तर कॅमेरा च्या मध्ये फ्लॅश आहे.

फोन चे अन्य स्पेसिफिकेशन पाहता या फोन मध्ये तुम्हाला वीवो एक्स21 प्रमाणे स्क्रीन वर फिंगरप्रिंट स्कॅनर मिळू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार शाओमी मी 8एक्स क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो. या फोनच्या स्क्रीन साइज ची माहिती अजून मिळाली नाही पण एवढे मात्र सांगण्यात आले आहे की या फोन मध्ये सध्यातरी फेस रिकॉग्निशन सारखे फीचर्स मिळणार नाहीत. बॅटरी बद्दल बोलले जात आहे की कंपनी यात 3,100 एमएएच ची बॅटरी देऊ शकते.

शाओमी मी 8 बद्दल बोलायचे तर या फोन मध्ये 2248 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.21-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन मीयूआई 10 वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.0 ओरियो आधारित आहे.

शाओमी मी 8 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो जो सध्यातरी सर्वात ताकदवान चिपसेट पैकी एक आहे. हा फोन 6जीबी रॅम सह येतो तर कंपनी ने हा 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी अशा तिन स्टोरेज मध्ये सादर केला आहे.

फोटोग्राफी साठी शाओमी मी 8 मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 12-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर आहेत. तर फ्रंट ला 20-मेगा​​पिक्सल चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मी 8 का सेल्फी कॅमेरा पण आर्टिफिशयल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी वापरतो.