Home बातम्या लॉन्चच्या आधी शाओमी मी 9 ची माहिती आली समोर, 12जीबी रॅम आणि 48एमपी चा असेल कॅमेरा

लॉन्चच्या आधी शाओमी मी 9 ची माहिती आली समोर, 12जीबी रॅम आणि 48एमपी चा असेल कॅमेरा

संपूर्ण जगाला माहितीच आहे कि शाओमी नेहमीच सॅमसंगला टक्कर देत आली आहे. सॅमसंग जेव्हा पण काही प्लान करते त्याआधी शाओमी आपला नवीन डिवाइस सादर करते. अलीकडेच समजले होते कि सॅमसंग गॅलेक्सी एस10 सह 12जीबी रॅम असलेला मॉडेल सादर करू शकते. परंतु सॅमसंगच्या आधीच शाओमी ने आपल्या नवीन मी 9 ची माहिती दिली आहे ज्यात 12जीबी रॅम असेल. खास बाब अशी कि शाओमीच्या या फोनची माहिती स्वतः कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली आहे. सोबत फोनचे काही स्पेसिफिकेशन पण शेयर करण्यात आले आहेत.

शाओमीच्या अधिकाऱ्याने काय म्हटले
शाओमी मी 9 चे स्पेसिफिकेशन स्वतः कंपनीचे फाउंडर, चेयरमेन आणि सीईओ ली जून यांनी सांगितले आहेत. त्यांनी यासाठी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर एक पोस्ट केली आहे ज्यात लिहिले आहे “आम्ही सावधानतापूर्वक शाओमी 9 चा ट्रांसपॅरेन्ट एडिशन तयार केला आहे.” सोबत त्यांनी या फोनच्या काही स्पेसिफिकेशनची पण माहिती दिली आहे.

त्यांनी माहिती दिली आहे कि ”या फोन मध्ये तुम्हाला न्यू स्काई—फाई स्टाइल सह 7—पीस लेंस असलेला कॅमेरा मिळेल. फोन मध्ये एफ/1.4 अपर्चर सह 48—मेगापिक्सलचा कॅमेरा असेल आणि 12जीबी रॅम असेल.”

त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये फोनच्या डिजाइन बद्दल पण काही कमेंट केल्या आहेत आणि लिहिले आहे कि या फोनचा बॅक पॅनल पण खूप पातळ आहे आणि ट्रांसपॅरेन्ट आहे. या पोस्ट सोबत त्यांनी फोटो पण शेयर केला आहे. हा फोन दिसायला गेल्यावर्षी लॉन्च शाओमी मी 8 एक्सप्लोर एडिशन सारखा वाटतो.

चीन पेक्षा पण जास्त भारतात विकले जातात शाओमीचे फोन!

शाओमी मी 9 चे स्पेसिफिकेशन
आतापर्यंत या फोन बद्दल बरीच माहिती समोर आली आहे ज्यानुसार शाओमी मी 9 मध्ये तुम्हाला कोर्निेंग गोरिल्ला ग्लास ची कोटिंग मिळेल. सोबत कंपनी फोटोग्राफी साठी यात लेजर ऑटोफोकस सारखे फीचर्स देऊ शकते. तसेच पीडीएएफ आणि सीडीएएफ (फेस एंड कॉन्ट्रास्ट डिटेक्शन ऑटोफोकस) सारखे फीचर्स पण मिळतील. तसेच आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या फोन मध्ये क्लोज्ड—लूप वाइस क्वाइल मोटर दिली जाईल जी ऑटो फोकस अजून चांगले करेल.

कंपनीचा दावा आहे कि शाओमी मी 9 मध्ये तुम्हाला ऑप्टिकल इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. हि फिंगरप्रिंट स्कॅनरची पाचवी जेनरेशन आहे जी आधीच्या सेंसरच्या तुलनेत 25 टक्के जास्त फास्ट आहे.

हे शाओमी स्मार्टफोन होतील नवीन आणि एडवांस मीयूआई 11 ने अपडेट, बघा तुमचा फोन आहे का या लिस्ट मध्ये

शाओमी मी 9 मध्ये सॅमसंग निर्मि​त एमोलेड पॅनलचा वापर केला गेला आहे जो एफएचडी+ डिस्प्ले सह येतो. तसेच या फोन मध्ये 103.8 परसेंट चा एनटीएससी वाइड कलर सपोर्ट आहे. तसेच यात सनलाइट मोड 2.0 सपोर्ट आहे आणि याबद्दल कंपनी म्हणते आहे कि “हा आउटडोर मध्ये कलर ऑप्टिमाइजेशन आणि ब्राइटनेस अजून चांगली बनवतो ज्यामुळे तुम्हाला स्पष्ट व्यू मिळतो.” शाओमी मी 9 चा स्क्रीन टू बॉडी रेशियो 90.7 परसेंट आहे.

आतापर्यंत लीक रिपोर्ट मध्ये केल्या गेलेल्या खुलास्यानुसार हा फोन क्वालकॉमच्या सर्वात ताकदवान 7 नॅनोमी चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर सादर केला जाऊ शकतो. तसेच 12जीबी वेरियंट सोबत 8जीबी आणि 6जीबी रॅम चे मॉडेल पण येऊ शकतात. सोबत यात 128जीबी आणि 256जीबी मेमरी वेरियंट असू शकतात. कंपनी हा 12एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह सादर करू शकते.